लॉकडाउन मध्ये अडकलेल्या प्रवाशांना एस . टी . चा मदतीचा हात , शिरपुरात मोफत बस सेवा सुरू .....




शिरपूर प्रतिनिधी : लोकडाउन मधील कालावधीत राज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन मंडळाच्या बसेस मार्फत  मूहवत करण्याची सुविधा देण्याबाबत दि . ९ मे रोजी शासनाने आदेशात केले होते . यांनुसार शिरपूर शहरातील  मोफत बस सुविधा आज रोजी सुरू झाली असून , शिरपूर टोलनाक्यापासून बिजासन घाट मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली आहे .  त्यामुळे रस्त्यावरील पायी जाणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला . या सेवेत इतर राज्यातील जे मजूर व नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे आणि महाराष्ट्रातील रहिवासी , मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आले आहे त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचवणे . या बाबींच्या समावेश आहे. या शिवाय कोणत्याही इतर प्रवाशांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस सेवा मोफत असनार नाही . असे जाहीर केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने