धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूवर (COVID 19) मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण आज सायंकाळी आपल्या घरी परतला. तो शिंदखेडा तालुक्यातील रहिवासी आहे. त्याला श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
धुळे जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज
byMahendra Rajput
-
0
