शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार आबा महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पत्रकार राहुल झोरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर असे दिनांक 16 मे रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पत्रकार राहुल झोरी यांनी वृत्त प्रकाशित केले होते त्यात शिरपूर तहसीलदार श्री आबा महाजन यांनी हाडाखेड येथे मजुरांचा मदत शिबीरात 61 मजूर यांचावर 45 लाख रुपयांचा शासकीय खर्च करून अपहार केला या बाबत तहसीलदार आबा महाजन आरोपाच्या कटघरयात अश्या आशयाचे वृत्त प्रसारित केले होते. सदरची बातमी ही चुकीची व खोटी असून या मुळे माझ्या मनास व प्रतिष्ठेला ठेच पोहचली आहे.शिवाय या नंतर आम्ही कार्यलयातून साय 5 वाजता शिंगावे येथील कोविड सेंटरला जात असताना सदर पत्रकार यांनी मला गेटवर भेटून या बाबत बाईट द्या असा आग्रह धरला मात्र सोशल अंतर पालन करण्यासाठी मी अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला व हाडाखेड येथे असा खर्च झाला नसून तेथे सेवा भावी संस्थेच्या मद्यमातून भोजन सेवा पुरवल्या जात आहेत असा खुलासा केला मात्र तरी देखील पत्रकार राहुल यांनी शासकीय कामात अडथडा निर्माण केला म्हणून तहसिलदार आबा गोविंद महाजन यांनी शिरपूर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. या बाबत चॅनल चे संपादक याना तक्रार केली असता आम्ही सदरची बातमी चॅनल वरून काढून टाकली आहे असे उत्तर दिले. म्हणून महाजन यांनी फिर्याद दिली आहे की बातमीची सत्यता न पाहता tv 9 मराठी चे पत्रकार राहुल झोरी यांनी खोटी बातमी प्रसारित करून माझी बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या नुसार शिरपूर पोलीस स्टेशन ला भादवी 186,187,500,501 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
