शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात पर्यटनाच्या संधी





बोराडी - लक्ष्मण गोपाळ 
शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाडपाणी ग्रुप ग्रामपंचायत येथील गुऱ्हाळपाणी अंतर्गत प्रधानदेवी,थुवानपाणी,निशानपाणी,साकडीपाडा,कंज्यापाणी,सामरादेवी,सितारपाडा,पळासपाणी इत्यादी पाडे येतात.


गुऱ्हाळपाणी हे गाव सातपुड्याच्या कुशीत वसलेले अतिदुर्गम गाव आहे.सदर गाव व अंतर्गत पाडे हे वनविभागांतर्गत येत असल्याने व डोंगर दऱ्या खोऱ्याच्या या भागात पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यास प्रशासनाला नेहमी मोठी कसरत करावी लागते.गुऱ्हाडपाणी बराचसा भाग डोंगर-दऱ्या,नद्या-नाल्यां-ओहळांनी वेढलेला आहे.भौगोलिकदृष्ट्या गुऱ्हाडपाणी हा समुद्रसपाटीपासून उंचावर असलेला गावांचा भाग नेहमीच तहानलेला असतो.गुऱ्हाडपाणीच्या एकीकडे मध्यप्रदेश राज्याची सिमा तर दुसरीकडे ऱ्हास होत चाललेल्या जंगलाचा भाग येथील प्रमुख समस्या म्हणजे मोबाईल टॉवर नसल्यामुले संपर्क करण्यासाठी होणाऱ्या अडचणी जर का गुऱ्हाडपाणी येथून कोणाशी संपर्क साधायचा असेल तर डोंगर माथ्यावर जाऊन मोबाईलचे नेटवर्क शोधून एकमेकांशी संपर्क साधावा लागतो 


तर दुसरी कडे वन विभागात येणाऱ्या क्षेत्रामुळे विविध जाचक अटीमुळे थांबलेला विकास तसेच वळणावळणाचा रस्ता त्यात कोसळले दगडाचे मथळे चार पाच दिवसापूर्वी दिलेल्या भेटीमुळे असे ज्ञात झाले की,विजेची देखील मोठ्या प्रमाणात समस्या आढळून येते कारण उंच दऱ्याखोऱ्यामध्ये येत असल्याने विद्युत वितरण कंपनीला देखील तारे वरची कसरत करावी लागते त्यामुळे या भागात विविध समस्याना सामोरे जावे लागते.


तसेच उन्हाळा चालू असल्याकारणामुळे नाल्याना पाणी पुरवठा नसल्याने येण्याजाण्याचा मार्ग उपलब्ध असून पावसाळ्यात गुऱ्हाडपाणी अंतर्गत येणारे थुवाणपाणी,निशाणपाणी, साकडीपाडा,कांज्यापाणी,सामरादेवी,सितारपाडा,पळासपाणी ह्या सर्व पाड्याचा संपर्क एकमेकांशी तुटून जातो,व येथील ग्रामस्थांना ४ ते ५ किलोमीटर डोंगर दऱ्या उतरून पायपीट करावी लागते तसेच परिसरातील प्रमुख समस्येपैकी एक असलेल्या गुऱ्हाडपाणी परिसरातील रोजगार नसल्यामुळे कुटुंबे विस्थापित झाली होती.रोजगाराची संधी नसल्याने या भागातील मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात स्थलांतरित होतात.मात्र रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्याचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही.तसेच व कोरोना या आजारामुळे ती लोक गावात परत आलेली असून त्यांना रोजगार यामुळे ते चिंतीत आहेत तसेच मद्यमातून प्रधानदेवी येथील पाणी प्रश्न सोडण्यासंबंधीची बातमी प्रकाशित केली असता तेथील पाणी प्रश्न ग्रामीण प्रशासनाच्या वतीने तात्काळ सोडवण्यात आला होता तर तेथील समस्यामध्ये काल झालेल्या घटनांनी हा परिसर नियमिय ग्रस्त असतो रात्री अपरात्री अश्या समस्यांना ग्रामस्थांना नेहमीच सामोरे जावे लागते काल बांबूची झोळी करून महिलेला दवाखान्यात पोहोचवण्याचे वृत्त प्रकाशित केले होते यासाठी ठोस उपाययोजना होणे फार महत्वाचे असून गुऱ्हाडपाणी हा परिसर वन संपत्तीने समृद्ध असा हा परिसर असून जर ग्रामीण प्रशासनाने लक्ष घातल्यास बोराडी पासून १० ते १२ किलोमीटर गुऱ्हाडपाणी गावाच्या पायथ्याशी असलेले धाबा देवीपाडा हे ऐतिहासिक पांडवकालीन लेण्यांनी समृद्ध असून पर्यटन वाढीस मदत होईल असे हे ठिकाण आहे.


तसेच उंच दऱ्याखोऱ्यानी नटलेला हा भाग पावसाळ्यात ह्याच भागात उंच उंच धबधब्याचे प्रवाह वाहताना बघायला मिळतात तसेच नेसर्गिकतेने समृद्ध उंच पहाडावर असलेले प्रधानदेवी हे स्थळ पुरातन वारसा समृद्ध असून मोठ्या प्रमाणात धनगर समाज आप आपले नवस फेडण्यासाठी लांब लांबून येत असतात त्यामुळे तसेच शिरपूर तालुक्यातील सर्वात उंच शिखर म्हणून बाबाकुवरला मान्यता आहे येथील वन संवर्धनाकडे लक्ष घातल्यास प्रती तोरणमाळ असे स्वरूप या स्थानाला प्राप्त होऊन पर्यटनासाठी नव नवीन संधी येथील लोकांना निर्माण होऊन स्वयंम रोजगार निर्मितीला चालना मिळेल.


 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने