मुंबई : उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार आहे. वर्षभरात मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांना ग्रेड दिला जाणार असल्याची माहिती उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. उच्चशिक्षण घेत असलेल्या हजारो विद्यार्थी आणि पालकांची चिंता लवकरच दूर होणार आहे. अंतीम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यासाठी शनिवारी मुख्यमंत्री, उच्चशिक्षणमंत्री आणी कुलगुरूंची व्हिडिओ कॉन्फरन्सींग द्वारे चर्चा झाली.जवळपास दोन तास या विषयावर चर्चा झाल्यानंतर काही गोष्टींवर सर्वांचे एकमत झाले आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात परीक्षा न घेता अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार गुण देण्यावर एकमत झाले असल्याचं उच्चशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माहिती दिली आहे.दिलेल्या ग्रेडवर जर कुणाचा आक्षेप तर तर परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बाबतचा अंतीम निर्णय लवकरच होईल, असे प्राजक्त तनपूरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील चिंतेत असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अंतीम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार, उच्चशिक्षण मंत्र्यांचा मोठा खुलासा
byMahendra Rajput
-
0
