देशात आता लॉकडाऊन नंतर अनलॉक-01 केंद्र सरकार कडून नियमावली जाहीर



मुंबई : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. नविन लॉक डाऊन ला आता अन लॉक 01 असे नवे नाव देण्यात आले आहे. या बाबत केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये   अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र विविध राज्य सरकार या बाबत पुढील दिशा निर्देश जाहीर करणार असून या लॉक डाऊन मध्ये अनेक सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद?

1. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम असणार

2. कंटेन्मेंट झोनमध्ये 1 जून ते 30 जूनपर्यंत लॉकडाऊन असणार

3. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदिरं, मशिदी, धार्मिक स्थळं सुरु होणार

4. रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार

5. रेड झोन बाहेर 8 जूनपासून शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी

6. राज्यांतर्गत किंवा राज्या अंतर्गत सर्व दळणवळणावर बंदी नाही

7. कसलीही परवानगी, मंजुरी किंवा ई-परमिटची गरज नाही

8. दळणवळणासंबंधी राज्यांना अंतिम निर्णयाचे अधिकार

9. प्रतिबंधित क्षेत्रे राज्य सरकार ठरवणार

10. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु

11. शाळा सुरु करण्यासंबंधी जुलैमध्ये निर्णय

12. राज्यांशी चर्चा करुन शाळांबाबत निर्णय घेणार

13. सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी

14. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा खाण्यास मनाई



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने