धुळे जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासी पास साठी अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

 धुळे प्रतिनिधी -  कोरोना च्या  संसर्गजन्य आजारामुळे  व देशात लागू असलेल्या लॉक डाऊन आणि संचारबंदी यामुळे अनेक नागरिक विद्यार्थी मजूर  प्रवासी  हे अडकून पडले आहेत  त्यांना  आपल्या आपल्या राज्यात किंवा गावी जाण्यासाठी  केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली असून  विविध राज्य सरकारांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार धुळे जिल्हयातून बाहेर जाणाऱ्या  मजूर / कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी 
http://dhule.gov.in या लिंक वर माहिती भरावी.

सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा / राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा / राज्याशी समन्वय करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे, आणी अधिक माहीतीकरीता सपंर्क 
02562-288066 या क्रमांकावर साधावा.
असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय धुळे  यांनी धुळे जिल्हा बाहेर जाणाऱ्या प्रवासी नागरिकांसाठी आवाहन केले आहे
 यात आपली माहिती भरत असताना मोबाईल क्रमांक आपण वापरत असलेल्या वाहनाच्या क्रमांक प्रवाशांची संख्या प्रवासाचा  कालावधी इत्यादी सविस्तर माहिती भरून अर्ज सादर करावयाचा आहे याबाबत स्थानिक पोलिस पाटील सरपंच यांच्याशी संपर्क साधून महा ई-सेवा केंद्रांवर जाऊन अर्ज भरावयाच्या आहे
 यानंतर काही नियम अटी आणि शर्ती त्यांच्या अधीन राहून सदरच्या परवानग्या देण्यात येणार आहेत कोणतीही लक्षणे नसलेल्या निरोगी व्यक्तींना परवानगी देण्यात येईल,  आणि फक्त परवानाधारक व्यक्तींनाच येणार असून या परवाना चा गैरवापर करणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे  तरी या बाबत  गरजू प्रवाशांनी अर्ज सादर करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने