खरीप कृषी उत्पादन कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न



धुळे - आज खरीप कृषी उत्पादन कार्यक्रम सन 2019-20 चा  आढावा आणि खरीप कृषी उत्पादन कार्यक्रम सन 2020-21 च्या उत्पादन आराखड्याची रूपरेषा ठरविण्याबाबत बैठक  मा.पालकमंत्री ना.अब्दुलजी सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष ना.डॉ.तुषारजी  रंधे खासदार सुभाषजी भामरे आमदार काशीरामजी पावरा आमदार कुणालजी पाटील आमदार मंजुळाताई गावित जिप कृषी सभापती रामकृष्णजी  खलाने  जिल्हाधिकारी संजयजी यादव मुख्य कार्यकारी अधिकारी सी वान्मथीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी शेतीसाठी मजुरांची उपलब्धता,कापसावरील बोडअळी बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती,शेतकरी बंधूना कर्ज वितरणाच्या अडचणी,जास्तीचे विद्युत ट्रान्सफार्मर,कापूस खरेदी केंद्राबाबत,शेतकरीना त्यांचा भाजीपाला वाहतुकीबाबत,शिरपूर तालुक्यातील अवकाळी वादळी पाऊसात झालेल्या शेतीमालाची नुकसान भरपाई तसेच  तालुक्यातील मंजूर प्रलंबित गावठाण फिटर बाबत,शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा कंपनीशी पाठपुरावाबाबत,कापूस खरेदी केंद्राबाबत,वनपट्टे धारक शेतकरींना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ देणेबाबत,अक्कलपाडा धरणातून नदीमध्ये पाणी सोडणेबाबत,सुलवाडे-जामफळ धरण संदर्भात भूमी अधिग्रहण बाबत तसेच इतर जिल्ह्यातून राज्यातून मजूर आणणेबाबत चर्चा झाली.वरील सर्व विषय गंभीर असून त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने