हाडाखेड चेकपोस्ट मार्गाने नागरिकांची लपतछपत ये जा सुरूच प्रवासी नागरीकांना स्थनिक प्रशासनासी संपर्क करण्याचे आवाहन




                शिरपूर तालुक्यातील हाडाखेड मार्गे शेकडो नागरिकांची महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यातून येजा सुरू तसेच हाडाखेड,सांगवी,पळासनेर ही सर्व गावे महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेश राज्यालगत सीमावर्ती भागाजवळ येतात त्यामूळे 
नागरिक सतत येजा करत आहेत
           
            जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.धुळे जिल्ह्यातही काही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहे.देशात दळणवळण बंद झाल्याने अनेक ठिकाणी कामावर गेलेले,तेथेच अडकून पडले आहेत.धुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पुणे मुंबई येथे नोकरी व कामानिमित्त गेले होते.तसेच कोरोना विषाणुंच्या संसर्गाने होणाऱ्या COVID-19 या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1887 लागू असून जिल्हाधिकारी, धुळे यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या असून जिल्ह्यातून कोणत्याही नागरिकास गावात प्रवेश देऊ नये.नागरिकांनीही प्रवेश करू नये व केल्यास प्रशासनास लपवून ठेवू नये.हाडाखेड या गावातून ये जा करणाऱ्यामध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे जिल्ह्यात १४४ लागू असतांनाही लोक ये जा करीत आहेत.

             त्यातील काही नागरिकांना होम कॉरणटाईन चे शिक्के मारलेले असतांना देखील सर्व नियमांचे उल्लंघन करून  हाडाखेड चेकपोस्ट येथून दिवसभरातून शेकडो नागरिक पायी अथवा मिळेल त्या वाहनाने तसेच सायकलच्या आधारे अथवा मोटरसायकलच्या साहाय्याने नागरिक येजा करीत आहे.
           मध्यप्रदेशातून तसेच गुजरात येथे कामाला गेलेल्या नागरिकांची येजा करणारांची संख्या लक्षणिय आहे. हे रस्ते सील करून देखील.लोक शेतातील रस्त्याने मिळेल त्या साधनांनी घरचा रस्ता गाठत आहेत. पोलिसांनी येथे कडक बंदोबस्त केला असला तरी हे नागरिक चोरट्या मार्गाने अथवा शेत शिवारातून  रास्ता काढत प्रवास करत आहे त्या मूळे पोलीस आणि प्रशासनाची हा प्रकार थांबवण्यासाठी दमछाक होत आहे.
 या साठी केंद्र सरकारने आदेश केला असून पर राज्यातील नागरिक व मजूर यांनी स्थानिक प्रशासन यांच्याशी संपर्क करावा  या साठी राज्य निहाय जाण्यासाठी अधिकारी यांची नियुक्ती केली असून नियम अटी ची पूर्तता करून यांची जाण्याची सोय करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने