ग्रामपंचायत चाकडू सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा, 42 लाख 42 हजाराचा अपहार, प्रकरणात झाला गुन्हा दाखल




 शिरपूर प्रतिनिधी  शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चाकडू अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून निष्पन्न झालेल्या आरोपांच्या अनुषंगाने पंचायत समितीचे  ग्रामविस्तार अधिकारी आर जी पावरा  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सांगवी पोलीस स्टेशन येथे ग्रामपंचायत मधील 42 लाख 42 हजारांच्या अपहार प्रकरणी सरपंच ग्रामसेवक  व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 विस्तार अधिकारी शिरपूर यांनी केलेल्या चौकशीमध्ये सदरच्या गैरव्यवहार समोर आला होता बाबतचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासन  यांना सादर केल्यानंतर  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी प्रकरणात रक्कम वसूल करून गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश पारित केले होते.   याबाबत चा ग्रामस्थांनी देखील आंदोलनाची हाक दिली होती सदर विषयावर कारवाई होण्यासाठी व तात्काळ गुन्हा दाखल होण्यासाठी  निर्भीड विचार  ने सतत पाठपुरावा केला होता  व याबाबत वृत्त प्रकाशित करून प्रकरणाला वाचा फोडली होती .विशेष म्हणजे यापूर्वी काही  काही महिने अगोदरच याच चाकडू ग्रामपंचायत मध्ये 67 लाखांचा अपहार समोर आला होता आणि या प्रकरणात देखील गुन्हे दाखल आहेत. शिवाय सरपंचांच्या बरखास्त करण्याबाबत देखील यांनी आदेश दिले होते मात्र या प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याने त्याला कलाटणी मिळाली आहे. असे असताना देखील पुन्हा याच ग्रामपंचायतीने नवीन अपहार करून  कायदा आणि सुव्यवस्था आव्हान दिले आहे.
  याबाबत चौकशी झाली असता असे समोर आले आहे की सन 2018 19 मध्ये कोणतेही विकास कामे न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने 42 लाख 42 हजारांची रक्कम अपहार केला आहे शिवाय याबाबतचे कागदपत्र आणि दस्तावेज देखील चौकशी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली नाहीत. दरम्यान ग्रामपंचायतीने 14 व वित्त आयोग.
, स्वच्छ भारत मिशन, अपंग निधी ग्रामनिधी इत्यादी योजनांच्या माध्यमाने कोणतीही विकासकामे करता लाखोंची  रक्कम बँक खात्यातून काढून घेतली आहे  शिवाय याबाबत अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका,कॅश बुक आणि इतर अभिलेख  सादर न केल्यामुळे  चौकशीअंती अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी शिरपूर यांनी आर जी पावरा यांना या कामी फिर्याद देण्यास आदेश दिला असता त्यांच्या फिर्यादीवरून तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशन मध्ये सरपंच ठुमाबाई सुक्राम मुखडे, ग्रामसेवक अमोल भदाणे, ग्रामपंचायत सदस्य तोबीबाई कोकण्या पावरा यांच्याविरुद्ध भादवी कलम 406 ,409 ,420 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 विशेष म्हणजे  याच ग्रामसेवक अमोल भदाणे यांनी मागील महिन्यात ग्रामपंचायत नांथे येथे देखील सरपंचांची दिशाभूल करून दोन लाख 80 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले आहेत त्यानुसार लवकरच हा देखील गुन्हा दाखल होणार आहे.
या पूर्वी देखील या ग्रामसेवकवर इतर अपहार प्रकरणात चौकशी व गुन्हा दाखल असून या ग्रामसेवकास कायमचे बरखास्त करण्याची मागणी या पूर्वीच निर्भीड विचार संपादक महेंद्र राजपूत यांनी लेखी पत्र देवून केली आहे.
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने