दौंड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण



दौंड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असल्याची माहिती दौंड चे वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक रासगे यांनी दिली. तालुक्यात पहिलाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील दहिटणे गावातील 60 वर्षीय वृद्धास सर्दी, खोकला व घसा दुखत असल्याने संबंधित व्यक्ती 25 एप्रिल रोजी राहू येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी गेला असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून
रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. आज दि.29 रोजी त्याची कोरोनाची तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे. दौंड च्या शेजारील बारामती, शिरूर, हवेली, इंदापूर या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण यापूर्वी आढळून आले होते.
दरम्यान आज दौंड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने