मुकटी येथील युवकांनी केली मजुरांच्या जेवणाची व्यवस्था




कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन केला असून,या  काळात आपआपल्या गावाकडे जाण्यासाठी पायी प्रवास करीत असलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे,आदिवासी पाड्यातील लोक आपले गाव सोडून शेतमजुरी साठी इतरत्र ठिकाणी कुटूंबा समवेत स्थायिक होतात, परंतु या लॉकडाऊन च्या काळात हाताला काम नसल्याने,ते आपल्या मूळगावी जाण्यासाठी पायी प्रवास करीत आहेत,या लोकांना रस्तावर चालत असताना कोणत्याही हॉटेल्स,व नास्ताची सोय उपलब्ध नसून त्यांच्या जेवणाची व्यवस्था गावातील धुळे -जळगाव महामार्गावरील नवनाथ मंदीरात करण्यात आली आहे, मुकटी गावातील ज्ञानेश्वर पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा दिवसापासून ही सोय करण्यात आली असून,गरीब व गरजू लोकांच्या भुकेल्याची भूक जाणून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य होत आहे,माणसा माणसात अंतर ठेवा माणुसकीत नको,हे ब्रीद जोपासून गावातील सर्वच युवकांचे सहकार्य लाभले आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने