शिरपूर - शाळा बंद मात्र आँन लाईन शिक्षण सुरु, गुरुदत्त कॉलनी येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पहिलीपासून ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हाँट्सअँप ग्रुप तयार करण्यात असून विषयानुसार नियोजन करण्यात आले. संपूर्ण महिन्याचे नियोजन करून वर्क फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात झाली. पालकांना तसेच विद्यार्थ्यांना त्याबाबतीत पूर्वसूचना देण्यात आल्या. दिलेला अभ्यास एक स्वतंत्र वही बनवून त्यात लिहावा असे देखील सांगण्यात आले. पालकांना देखील मार्गदर्शन करण्यात आले.तसेच कोरोना या आजारासंबंधी जनजागृती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक आर.टी.भोई, शिक्षिका श्रीमती. भारती मराठे, श्रीमती.छाया वाडीले, श्रीमती अलका गोराणे, एस.के.भील, श्रीमती हर्षदा भावसार, श्रीमती शितल पाटील आदी शिक्षक यासाठी प्रयत्न करत आहेतया अभिनय उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजीशालेय शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी कौतुक केले आहे.
शाळा बंद मात्र आँन लाईन शिक्षण सुरु, गुरुदत्त कॉलनी येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेतील उपक्रम
byMahendra Rajput
-
0
