शिरपूर - माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी पाठपुरावा केल्याने तसेच तहसीलदार आबा महाजन, एस.टी. डेपो मॅनेजर वर्षा पावरा यांच्या सहकार्याने वरला मध्य प्रदेश सीमेपर्यंत 45 मजुरांना दोन एस. टी. बसेस मार्फत शिरपूर येथून रवाना करण्यात आले.शिरपूर शहराजवळ शनी मंदिरात परिसरात अरुणावती नदी पात्र जवळ अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील 45 मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी पाठपुरावा करून सोय करण्यात आली. यासाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी तहसीलदार आबा महाजन व एस.टी. व्यवस्थापिका वर्षा पावरा यांना याबाबत सविस्तर माहिती देवून सूचित केले. त्यानुसार शिरपूर पीपल्स बँकेचे संचालक संजय चौधरी, तलाठी श्री राजपूत, मयूर राजेंद्र चौधरी यांनी कागदपत्रे तयार करण्याबाबत लक्ष घालून चांगले सहकार्य केले.मंगळवारी दि. 26 मे रोजी सकाळी 9 वाजता सर्व 45 मजुरांना वरला मध्य प्रदेश सीमेपर्यंत दोन बसेस मध्ये बसवून रवाना करण्यात आले.यावेळी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, तपनभाई पटेल, एस.टी. डेपो मॅनेजर वर्षा पावरा, तलाठी श्री राजपूत, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, राजेंद्र दौलत चौधरी, मयूर चौधरी, संतोष चौधरी, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी तसेच यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी व श्री संताजी फ्रेंड्स सर्कल तर्फे सर्व मजुरांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
शिरपूर येथून वरला मध्य प्रदेश सीमेपर्यंत 45 मजूर दोन एस. टी. बसने रवाना
byMahendra Rajput
-
0
