मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचे सर्व शिवसैनिकांनी पालन करावे : हेमंत साळुंके


 

धुळे (प्रतिनिधी) : धुळे जिल्हा ग्रामीण मधील सर्व शिवसैनिक, बांधव व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी कोविड-19 संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शिवसेना धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले आहे.

यासंदर्भात श्री.साळुंके यांनी शिवसैनिकांसाठी एक पत्रक प्रसिध्दीस दिले असून त्यात म्हटले आहे की, संपूर्ण भारत देशामध्ये कोरोना विषाणुने थैमान घातलेले असून संपूर्ण जगही कोरोना विषाणुंशी लढा देत आहे. अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उध्दव ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यात श्री.साळुंके यांनीही सहभाग घेतला होता. सदर बैठकी दरम्यान धुळे जिल्ह्यातील सदरची कोविड निवारणार्थ असलेली स्थिती विषद करण्यात आली. तसेच सद्य परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुर, कामगार, छोटे-मोठे व्यापारी, उद्योगधंदे, रेशनिंग, खते व बी-बियाणे याबाबत मा.मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. याबाबतीत कुठेही काहीही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ मुख्यमंत्री कार्यालय अथवा शिवसेना भवन येथे संपर्क साधून अवगत करावे. जेणेकरुन तात्काळ कार्यवाही करता येईल. असे आवाहन ही श्री.ठाकरे यांनी केले.  ते पुढे म्हणाले की, कोविडचे संकट मोठे आहे. महाराष्ट्रात आपण कोविड निवारणार्थ अनेक उपाययोजना करत आहोत. अनेक ठिकाणी आपण बेडची व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात 15 हजार कोविड रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे या संकटाशी मुकाबला करुन हि लढाई आपण निश्चितच जिंकू असे ते म्हणाले. यावेळी धुळे जिल्ह्यातील सी.सी.आय.मार्फत सुरु असलेली कापूस खरेदी पणन महासंघामार्फत लवकरात लवकर ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरु करावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना महात्मा फुले कर्ज मुक्ती योजनेत पात्र लाभार्थ्यांना पिक कर्ज देण्यांत यावे. रेशन दुकानावर गहू, तांदुळ सोबत दाळ पण उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी मा.मुख्यमंत्र्यांना सांगितले. अशा गंभीर संकटसमयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांना काही सुचना केलेल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे : 1) महाराष्ट्रात राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने रक्तासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असल्याने सर्व शिवसैनिकांनी रक्तदान शिबीरे घ्यावेत. 2) धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील जे खाजगी डॉक्टर रुग्ण सेवा देण्यास तयार असतील त्यांची यादी तयार करुन जिल्हाप्रमुखांना पाठवा. 3) भविष्यात धुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढली तर मंगल कार्यालय, गोडावून, शाळा यांची गावनिहाय यादी तयार करुन जिल्हाप्रमुखांकडे पाठवा. 4) प्रत्येक गावातील पंचावन्न वर्षावरील लोकांची फोन नंबरसह यादी तयार करुन त्यांना मधुमेह रक्तदाब, कर्करोग, अथवा इतर गंभीर आजार असतील अशा लोकांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्या व यादी जिल्हाप्रमुखांकडे पाठवा. 5) कोरोना विषाणुशी लढत आलेले डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ, पोलीस कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांना विशेष सहकार्य करा. 6) रेशन धान्य वाटप, खते, बी-बियाणे वाटप, ज्वारी व मका खरेदी करतांना कापूस खरेदी होत असतांना तक्रारी असतील तर जिल्हाप्रमुखांशी संपर्क साधण्याचा सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आहेत. या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी केले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने