शिरपूर शहरात कोरोना रुग्णात वाढ, संपर्कातील 2 कोरोना पॉझिटिव्ह




शिरपूर -  शिरपूर शहरात कोरोना रुग्णात वाढ होत असून  आताच जिल्हा रुग्णालय धुळे येथील आलेल्या २३ अहवालानुसार उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. सदरील व्यक्ती हे परवा पॉजिटिव्ह आलेल्या पाटीलवाडा शिरपूर येथील रुग्णाच्या संपर्कातील ७१ वर्ष पुरुष व ६९ वर्ष वयाची महिला आहेत. दोन्ही रुग्ण उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल आहेत. दरम्यान जिल्हयातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १२० झाली आहे़ आज २१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे़ त्यात रतनपुरा व वडेलचे १६, धुळे शहरातील ३, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील २ दोघांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा करोना नोडल अधिकारी डॉ विशाल पाटील यांनी दिली़
  

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने