शिरपूर - अखिल भारतीय किसान सभेने आज दि.27 मे रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय झाला होता त्या अनुषंगाने आज शिरपुरात धुळे जिल्हा किसान सभा यांनी तहसीलदार शिरपूर व उप विभागीय अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन सादर केले आहे. यात प्रामुख्याने शेतकर्यांना मुबलक प्रमाणस खते, बी बियाणे उपलब्ध करून दयावे, शेतकरी ची सर्व प्रकारची कर्ज माफी देणात यावी, दुर्घटनेत मयत झालेल्या शेतकरी व शेतमजूर याना 50 लाख भरपाई देण्यात यावी,किसन परिवारास 10 हजार प्रोत्साहन भत्ता द्यावा,किसन सन्मान योजनेत 18 हजार रुपयांची तरतूद करण्यात यावी,महागाई कमी करून शेतमालाला भाव करून द्या, पिकांची नुकसानी भरपाई देवून तालुक्यातील रेशन चा काळाबाजार बंद करा अश्या मागण्यांसाठी निवेदन दिले आहे.या वेळी अँड.मदन परदेशी, काँ.अर्जुन कोळी, यांनी मागण्याचे निवेदन देण्यात आले.सोशल डिसटींग चे पाळत करत यांनी सदरील निवेदन देण्यात आले.शेतकऱ्यांचा प्रश्नावरती अनेक मागण्या चे निवेदन देऊन शासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्हा यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन
byMahendra Rajput
-
0
