शिरपूर - देशभरात व महाराष्ट्र राज्यात कोरोना अर्थातच ( covid- 19 ) या संसर्गजन्य आजाराचे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून प्रशासनाने अनेक प्रकारचे निर्बंध घातले असून शाळा , कॉलेज , महाविद्यालये थिएटर बंद केले असून मोल आणि गर्दीची ठिकाणे सभा , मेळावे घेण्यास मनाई केली आहे तरी देखील नागरिकांना कोरोना आजाराची लागण होऊ नये व बचावाच्या उपाययोजना यांच्या जनजागृती साठी दि , 19 रोजी शिरपूर तहसील कार्यालयात खबरदारीच्या उपयोजनांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सदर बैठकीस आमदार काशीराम पावरा , तहसीलदार आबा महाजन मुख्याधिकारी अमोल बागुल , गटविकास अधिकारी वाय डी शिंदे सहाय्यक गटविकास अधिकारी सौ सुवर्णा पवार जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी , डॉ असोसिएशन चे सदस्य डॉ पितांबर डिगोरे , पोलीस विभागातील अधिकारी एसटी विभागातील अधिकारी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी विविध राजकीय पक्षाचे अधिकारी, व्यापारी असोसिएशन चे सदस्य ट्रॅव्हल्स कंपनी चे मालक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार,marraige lons चे मालक इ. उपस्थित होते।
यावेळी नागरिकांनी घाबरून न जाता या रोगापासून बचावासाठी सुरक्षेचे उपाययोजना करावी । गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आपल्या गाव परिसरातील जर कोणी कोरोनाग्रस्त संशयित रुग्ण असतील तर प्रशासनाला सूचित करावे । असे आवाहन करण्यात आले । शिरपूर शहरात आणि तालुक्यात बाहेर देशातून आलेल्या लोकांच्या शोध घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम प्रशासन करत असून पुण्यामुंबई हुन येणाऱ्या लोकांची नावे, पत्ता , संपर्क क्रमांक व कोठे जाणार या सर्वांची नोंद घेऊन प्रशासनाला काळवण्याचे आदेश देण्यात आले आहे शिवाय प्रत्येक खाजगी बस मालकांनी गाडीत sanitiezers आणि मास्क वापरणे बंधनकारक केले आहे । तालुक्यातील आशा वर्कर देखील घरोघरी जनजागृती करून संशयित रुग्ण आणि बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींची विचारपूश करतील अशे आदेश आरोग्य विभागाने दिले आहे । यावेळी उपस्थित डॉक्टरांनी कोरोनविषयी अधिक माहिती देत प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक नसून त्याऐवजी आपल्याकडील स्वच्छ रुमाल चा वापर करने , दिवसातून वारंवार आपले हात आपल्याकडे उपलब्ध असतील त्या साबणाने किंवा handwash ने स्वच्छ धुणे इ, उपाय करण्यास सांगून स्वच्छ आणि स्वस्थ राहण्यास सांगितले आहे । कोणीही सार्वजनिक ठिकाणी गुटखा , पान, खाऊन थुंकू नये अन्यथा कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे । यावेळेस मेडिकल असोसिएशन ने कार्यालयांना मास्क भेट दिले । आमदारा काशीराम पावरा यांनी सर्वांनी एकत्रितपने तालुक्यावर आलेल्या दोन संकट कोरोना आणि गारपीट यावर मात करण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला । मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी समारोप केला ।।।।।