तालुक्यातील उपरपिंड तलाठी यांची तात्काळ बदली करा, ग्रामस्थांची मागणी



शिरपूर -  शिरपूर तालुक्यातील   उपरपिंडयेथील कार्यरत तलाठी  श्री डी.सी निंबाळकर सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी तहसीलदार शिरपूर आणि उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग यांना दिले आहे.यात असे नमूद करण्यात आले आहे की लिंबाळकर तलाठी हे गिधाडे सजात नव्याने बदलून रुजू   झाले आहेत.  उपरपिंड हे  गिधाडे सजा मध्ये समाविष्ट आहे मात्र तलाठी निंबाळकर हे सजेच्या नावावर नेहमीच गैरहजर राहत असतात.  त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे,   गावात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते सदर पिकांचे पंचनामे देखील करण्यात आलेले आहेत.  त्याच्या अहवाल शासनास सादर केलेला आहे. गावातील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतीही मदत शासनाकडून मिळालेले नाही त्यामुळे सदर शेतकरी वर उपासमारीची वेळ आली आहे .याबाबत तलाठी निंबाळकर यांना गावकऱ्यांनी वेळोवेळी अवगत केलेले आहे आपल्या आवश्यक ते कागदपत्र देखील   सादर केले आहेत परंतु तलाठ्यांनी त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही केली  नाही . या बाबत विचरना केली असता वरिष्ठ अधिकारी सदर कागदपत्र घेत नाही अशा प्रकारची उत्तरे दिली जातात .सतत गैर हजार असल्यामुळे त्यांच्याशी कोणताही संपर्क नागरिकांना करता  येत नाहीत त्यामुळे निवेदनात मागणी केली आहे की निंबाळकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी.
सदरच्या निवेदनावर जिल्हा परिषद सदस्य भरत पाटील ,वसंत भिल, अनिल सिंग राजपूत, योगेश पाटील, भाऊसाहेब कोळी, संदीप ठाकरे गोपीचंद पाटील  यासह इतर गावकऱ्यांच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने