‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
अभ्यासिका, लॉन्स, हॉटेल्स 31 मार्चपर्यंत बंद
: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक येण्यास मनाई
धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेलमधील अथवा अन्य वास्तूमधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमीटरूम, बिअरबार, उद्याने, संग्रहालये, ऑनलाइन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, राज्यात ‘कोरोना’ विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेजागतिक आरोग्य संघटना व आरोग्य वकुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठीप्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोनाविषाणूमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालिन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साथरोग अधिनियमातील खंडानुसार राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून सुरू झाली आहे.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे जिल्ह्यातील अभ्यासिका, लग्न व अन्य समारंभाची सभागृहे, शैक्षणिक संस्थेचे मैदान, रहिवास वस्तीमधील मैदाने, लॉन्स, हॉटेल मधील अथवा अन्य वास्तू मधील मॅरेज हॉल, कम्युनिटी सेंटर, पानपट्टी, कॉफी, ज्यूस हाऊस, सर्व हॉटेल्स (होम डिलिव्हरी वगळून), सर्व परमिट रूम,बिअरबार, उद्याने, संग्रहालये, ऑनलाईन लॉटरी सेंटर, प्रशिक्षण वर्ग आदी स्थळांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्यात येत आहेत.
तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी विहीत कारणाशिवाय येण्यास मनाई राहील. याशिवाय वर नमूद ठिकाणी याआधी कार्यक्रमासाठी आरक्षण,परवानगी दिलेली असल्यास ती रद्द करण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19) उपाययोजना नियम, भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्ह्यात निवेदने, आंदोलनांना मनाई
: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एकत्रित येवून देण्यात येणारी निवेदने, आंदोलने, रास्ता रोको, घंटानाद, उपोषण, धरणे, मोर्चे, आत्मदहन आदी आंदोलनात्मक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत मनाई करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, राज्यात कोरोना (COVID 19) या विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात ‘कोरोना’ विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालिन उपाययोजना म्हणून साथरोग अधिनियमाची राज्यात 13 मार्च 2020 पासून अंमलबजावणी सुरू आहे.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार वरील आदेश देण्यात आले आहेत. ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांकडून किंवा संघटनांकडून सार्वजनिक पक्षांकडून, संघटनांकडून सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी एकत्रित येवून विविध मागण्यांसाठी होणारी विविध प्रकारची निवेदने, आंदोलने, रास्ता रोको, घंटानाद, उपोषण, धरणे, मोर्चे तसेच आत्मदहन आदी आंदोलनात्मक कार्यक्रमांवर अशा ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे ‘कोरोना’ विषाणू या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यावर पुढील आदेश होईपर्यंत मनाई करण्यात येत आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID 19) उपाययोजना नियम, भारतीय दंड संहितेतील कलमातील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
अनेरडॅम वन्यजीव अभयारण्यात
ग्रामस्थ व पर्यटकांना प्रवेश बंदी
धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्यासह कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य (अहमदनगर), नांदूर- मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (नाशिक), यावल वन्यजीव अभयारण्यात (जळगाव) 31 मार्च 2020 पर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती नाशिकचे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाची अधिसूचना आणि जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ विषाणू (COVID 19) ही जागतिक साथ घोषित केल्याचे लक्षात घेवून या विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच या विभागांतर्गत येणारी वरील अभयारण्ये क्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थ व पर्यटकांची सुरक्षा व आरोग्याच्या दृष्टिने वरील अभयारण्ये 31 मार्च 2020 पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील.
वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्या वन परिक्षेत्रातील परिमंडळ, नियत क्षेत्रामध्ये संबंधित कर्मचारी उपस्थित राहतील. ते या अभयारण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश बंद करतील, असेही वनसंरक्षक अ. मो. अंजनकर यांनी म्हटले आहे.
00000
धुळे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार
पुढील आदेशापर्यंत राहणार बंद
: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, राज्यात ‘कोरोना’ विषाणूमुळे (COVID-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळेजागतिक आरोग्य संघटना व आरोग्य वकुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठीप्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोनाविषाणूमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालिन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साथरोग अधिनियमातील खंडानुसार राज्यासमिळालेल्या अधिकारानुसार राज्यात साथरोग अधिनियमाची अंमलबजावणी 13 मार्च 2020 पासून सुरू झाली आहे.
‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस त्याच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीधुळे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत आहेत, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.