शिरपूर वरवाडे नगरपरिषद कडून नागरिकांना जाहीर आवाहन....




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर वरवाडे नगर परिषद यांचे कडून शिरपूर शहरातील सर्व नागरिकांसाठी जाहीर आवाहन करण्यात आले आहे की , माननीय जिल्हा अधिकारी सो.  धुळे यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शिरपूर शहरातील अभ्यासिका , लग्न व अन्य समारंभाचे सभागृह , शैक्षणिक संस्थांचे मैदाने व रहिवासी वास्तूतील मैदाने , लॉन्स , हॉटेल , मधील अथवा अन्य वस्तू मधील मंगल कार्यालय , कम्युनिटी सेंटर , पानपट्टी , कॉफी , ज्युस सेंटर , सर्व हॉटेल , परमिट रूम , बिअर बार , उद्यान , संग्रहालय , ऑनलाईन लॉटरी सेंटर ,  प्रशिक्षण सेंटर , आठवडे बाजार , इ. दि. ३१ मार्च पर्यंत बंद करण्यात येत आहे . यात जीवणावश्यक वस्तू किराणा माल  , मेडिकल स्टोअर , दूध आणि भाजीपाला यांना वगळण्यात आले आहे तसेच नागरिकांना अनावश्यक सार्वजनिक ठिकाणी विहित कारणाशिवाय येण्यास मनाई आहे . या आदेशाचे उल्लंघन करतांना व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र उपाययोजना नियम २०२० चे कलंक २१ नुसार  भारतीय दंड सहीता ४५ चे १८६० , कलंक १८८ मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कार्यवाही साठी पात्र राहील . तरी याची सर्व नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी . 

जाहीर आवाहन ...... 

 तसेच शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की ..  कोरोना विषाणू च्या प्रसाराला रोखण्यासाठी गर्दी टाळणे हा सर्वाधिक प्रभावी उपाय असल्याने व शासन स्तरावर वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करणे कामी , शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने नागरिकांना कराचा भरणा जन्म-मृत्यू दाखले व इतर अर्ज हे नागरिकांकडून  नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीच्या बाहेरील बाजूस खिडकीतून स्वीकारण्यास येते .व दर्शनी गेटमधून एक वेळेस एकाच व्यक्तीला प्रवेश असेल . तसेच  नागरिकांची काही तक्रार असेल तर एकाच नागरिकास प्रवेश देऊन तक्रार खिडकीतून स्वीकारण्यात येईल व तक्रारींचे निराकरण केले जाईल याची नागरिकांनी निवड घ्यावी .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने