आपला_हक्क... आपला_अधिकार...




भांडुप ( शैलेश सणस )*१५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या* निमित्ताने एस वार्ड भांडूप मधील काही शिधावाटप केंद्रावर भेट देऊन प्रथम ग्रांहक दिनाच्या शुभेच्छा देऊन विभागातून  नागरिकांन कडून शिधावाटप केंद्रावर घेतलेल्या धान्याची पावती मिळणे, निष्कृष्ट दर्जाचे धान्य, धान्याच्या साठ्याची नोंदणी तसेच माहितीचे सूचना फलक लावण्याबाबत अश्या अनेक प्रकारच्या तक्रारीच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले व शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शिधावाटप केंद्र चालवून ग्राहकांना दिलासा दयावा अशी विनंती करण्यात आली तसेच शिधावाटप केंद्रातील चालकांच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या त्या त्वरित शिधावाटप कार्यालयातील संबंधित अधिकारीना सांगण्यात आल्या अजून काही तक्रार असल्यास आम्हाला आपण लेखी स्वरूपात द्यावे आम्ही त्या आमच्या माध्यमातून पुढे पाठपुरावा करू असे सांगण्यात आले आहे. त्या वेळेस माझ्या बरोबर माझे सहकारी उपप्रभाग संघटक मंगेश पाष्टे,जयेश परब,शंकर  राणे,वैभव काते,मंगेश भोसले ,दिपक जैन सहप्रभाग संघटक ललित पटेल,किरण भोसले, शाखा अध्यक्ष अरुण कुंभार,माजी शाखा अध्यक्ष संदेश खेडेकर व महाराष्ट्र सैनिक भास्कर सावंत,विनयदत्त टेमकर,काशिनाथ लब्दे, संदीप पंतकोल ,नवनाथ पेंडेकर, दिलीप शिर्के हे उपस्थित होते. एस वार्ड भांडूप मधील अजून काही बाकी असलेल्या शिधावाटप केंद्रावर भेट देऊन निवेदन लवकरच देण्यात येणार आहे.
*भांडूपकरांना शिधावाटप_ केंद्रांवर कोणतीही तक्रार असल्यास संपर्क साधावा हि नम्र विनंती.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने