शिरपूर - २०१५ पासून बोरगांव येथील जि.प शाळेतील एक वर्ग खोली जिर्ण अवस्थेत असल्याने मोडकळीस आली होती.यामुळे येथील शिकणाऱ्या चिमुकल्यांंना मोठी दुर्घटनेला समोरे जावे लागले असते.मात्र ती वर्ग खोली बंद करून एकाच वर्ग खोलीत सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे.अनेकदा परिसरातील राजकीय मंडळी,संबंधित अधिकारी व बातम्या लावुन याबाबत नविन वर्ग खोली मंजूर करावी याबाबत सांगण्यात येत होते.मात्र कोणीही दखल घेत नव्हते मात्र २०१५ पासून सुरू असलेला याबाबतचे खटाटोप सुरुच होता.अखेर मात्र आपल्या परीसरातील नवनिर्वाचित जि.प सदस्या सौ.अभिलाषा भरत पाटील यांनी बोरगांव येथे एक वर्ग खोली मंजूर केली.यासाठी भरत भीला पाटील यांची मदत लाभली.उशिरा का असेना मात्र लहान चिमुकल्यांसाठी जिव धोक्यात घालून शिकण्याची अवश्यकता आता राहीली नाही हे नक्की, भरत पाटील व सौ अभिलाषा पाटील यांचे मनापासून आभार.२०१५ पासुन वर्गखोलीचा प्रश्न बातम्यांंद्वारे प्रसिद्ध करत राहीलो अखेर येथे एक वर्ग खोली मंजूर झाल्याचे ऐकल्याने समाधान वाटले. असे मत मराठी पत्रकार परिषद तालुकाध्यक्ष अमोल राजपूत यांनी वक्त केले आहे .
Tags
news