आपले सरकार” च्या संगणकपरिचालकांचे उद्या पासून बेमुदत कामबंद आंदोलन २९००० ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज होणार ठप्प;आय टी महामंडळात घेण्याची प्रमुख मागणी शासनाने मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार - सिद्धेश्वर मुंडे





मुंबई(प्रतींनिधी)राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सुमारे २३ हजार संगणकपरिचालकांना सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे आजाद मैदानावर येऊन दिलेल्या शब्दानुसार राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट् माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती कर्मचारी म्हणून नियुक्ती द्यावी व कामगार कायद्यानुसार किमान वेतन द्यावे तसेच आपले सरकार प्रकल्पात सुमारे ३०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दिल्लीच्या CSC –SPV कंपनीवर कारवाई करावी यासाठी राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीचे काम करणारे संगणकपरिचालक १६ मार्च पासून बेमुदत संपावर जात  असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

        याबाबत सविस्तर वृत्त की,मागील ८ वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत व डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायती मधील संगणकपरिचालक करत आहेत.त्यात ३३ प्रकारचे विविध दाखले देणे,सर्व प्रकारच्या ऑनलाईन नोंदी ठेवणे,जमा-खर्चाची नोंद घेणे यासह लाखो शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन करणे,पिकविमा योजना,घरकुल योजनेचा सर्व्हे करणे आदि अनेक प्रकारची कामे संगणकपरिचालक करतात परंतु संगणकपरिचालकाना अतिशय तुटपुंजे असे ६००० रु मानधन निश्चित असताना ते सुद्धा एक-एक वर्ष मिळत नाही.राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आय.टी.महामंडळाच्या माध्यमातून एका कायमस्वरूपी कर्मचार्‍याची आवश्यकता असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या माध्यमातून नागपुर,मुंबई तसेच राज्यभरात अनेक आंदोलने केली परंतु तत्कालीन शासनाने केवळ आश्वासन देऊन संगणकपरिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.मागील हिवाळी अधिवेशना दरम्यान २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई येथील आजाद मैदानावरिल संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती तसेच ३० नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी तत्कालीन विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील संगणकपरिचालकाना १० दिवसात बैठक घेऊन आय.टी.महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतु त्यांनी ०९ सप्टेंबर २०१९ रोजी ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाला आदेश देऊन आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती.परंतु ३ महीने होऊन सुद्धा संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती मिळाली नसल्यामुळे दरम्यान च्या काळात संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांना निवेदने देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली असता अद्याप पर्यंत शासनाने काहीच हालचाल केलेली नाही.त्यामूळे १६ मार्च पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक कामबंद आंदोलन सुरू करत असून शासनाने मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार  असल्याची माहिती संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे
          या काम बंद आंदोलनात *शिरपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालक यांनी सहभाग दर्शविला आहे या संदर्भात पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय श्री वाय डी शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करूनही शासन कुठल्या प्रकारचा ठोस निर्णय घेत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे व त्यात आम्ही शिरपूर तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झालो आहोत अशी माहिती शिरपूर तालुक्याचे अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने