धुळे येथील एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अजंग गावात सर्वे, उन्नत भारत अभियान अंतर्गत उपक्रम



धुळे - मानव संसाधन विकास मंत्रालय अंतर्गत उन्नत भारत अभियान संपूर्ण भारतात राबविले जात आहे. आयआयटीदिल्ली या मुख्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सर्व उच्च शिक्षण संस्था काम करीत आहेत. या मिशन साठी श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित धुळे येथील एस. व्ही. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अजंग गावात सर्वे केला.
 अभियांत्रिकी महाविद्यालया उन्नत भारत अभियान सेलची स्थापना प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्या आली. या सेलचे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर प्रा.मोहम्मद जुनेदुद्दीन आहेत,. यात सिव्हिल , इलेक्ट्रिकलमेकॅनिकलकॉम्पुटर तसेच इन्फॉर्मशन टेकनॉलॉजिच्या सर्व  विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. या अभियांत्रिकी महाविद्यालयाने एकूण  गावे दत्तक घेतली आहेत.
इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अजंग गावात जाऊन सर्वे केलायावेळेस गावातील एकूण ६५ घरांचा सर्वे केला.  त्यात गावातील समस्या जाणून घेतल्यात्यात शुद्धपाणीस्वच्छतासोलर एनर्जी तसेच कचरा व्यवस्थापन नियोजनासाठी काय उपाय योजना करता येतील या संदर्भात ग्राम सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थांनी घराघरात जाऊन दिलीग्राम सभेत अजंग गावाचे सरपंच सौ.सुनंदाबाई माळी, माजी सरपंच डॉ. दिनेश माळी, मुख्याध्यापक दिलीप पाटील, सचिन माळी तसेच या सेलचे को-ऑर्डिनटर प्रामोहम्मद जुनेदुद्दीन , मनोज सोनारउपस्थित होते .योगेश चौधरीराहुल ठाकूरदिग्विजय देवरेरवींद्र बडगुजर यांनी सहकार्य केले.

या कार्याबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेलट्रस्टी तपनभाई पटेलव्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारीधुळे कॅम्पसचे सल्लागार डॉ. अजय पसारीधुळे कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. के .बी.  पाटीलप्राचार्य डॉ. निलेश साळुंखे आदींनी कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने