बोराडीत प्रशिक्षण संपन्न



बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात अटल टिंकरींग प्रयोगशाळेत प्रशिक्षण संपन्न झाले आहे.निती आयोगाच्या योजनेंतर्गत बोराडी सारख्या आदिवासी दुर्गम भागातील तालुक्यातील बोराडी येथे अटल टिंकरींग प्रयोगशाळा मंजूर झाली आहे.विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे म्हणून केंद्र सरकारमार्फत निवडक शाळांमध्ये ही योजना राबवली जात आहे.सहा वर्षात सुमारे वीस लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.रोबोट,थ्री-डी प्रिंटर,सेंसर,ड्रोन याविषयी तंत्रशुद्ध माहिती मिळुन तशा प्रकारचे साहित्य तयार करता येणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात इलेक्ट्रॉनिक शिक्षणासाठी आताच ज्ञान मिळणार आहे.विद्यार्थीनींना अधिक माहिती मिळावी यासाठी पुणे येथील संगणक अभियंता सात्विक सोनजे यांनी एकदिवसीय प्रशिक्षण दिले.यावेळी  प्रयोगशाळेचे संचालक निरज निकम,शाखाप्रमुख कल्पना पाटील,गणेश भामरे, टी.टी.ढोले,एस.ए.अहिरे,सी.एस.बडगुजर,मधुकर सोनवणे,राजेंद्र गिरासे,संचालक निरज निकम उपस्थित होते.सुत्रसंचालन गणेश भामरे यांनी केले.या उपक्रमाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे, कि.वि.प्र.संस्थेचे सचिव निशांत रंधे,कोषाध्यक्षा आशाताई रंधे,शामकांत पाटील,शशांक रंधे यांनी कौतुक केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने