वाघाडीत तुकाराम महाराज बीज उत्सव कार्यक्रम संपन्न



वाघाडी - दि.11 मार्च 2020 रोजी श्री संत तुकाराम महाराज बहुउद्दिष्ट पाटील समाज मंडळ वाघाडी तर्फे श्री. जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास सिताराम पाटील होते,यावेळी  गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व श्री संत तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायकराव देवरे यांनी केले. प्रतापराव हिम्मतराव पाटील (माजी सरपंच ग्रामपंचायत वाघाडी),उज्वला प्रतापराव पाटील सरपंच ग्रामपंचायत वाघाडी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव सिताराम पाटील व गावातील जेष्ठ नागरिकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.यानंतर मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते समाजातील निवृत्त कर्मचारी,विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणारे विद्यार्थी,दहावी-बारावी व पदवी परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी यांना मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उमाकांत यशवंतराव पवार( माजी सरपंच ग्रामपंचायत वाघाडी),प्रतापराव हिम्मतराव पाटील (माजी सरपंच ग्रामपंचायत वाघाडी) श्रीराम दयाराम माळी अध्यक्ष तंटामुक्त समिती वाघाडी, ज्ञानेश्वर भामरे, शांतीलाल पाटील,ज्ञानेश्वर पाटील इ. मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वासराव सिताराम पाटील यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय देवरे यांनी केले. व आभार प्रदर्शन नवनीत पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश बाजीराव पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाघाडी,मंडळाचे सचिव गजानन पाटील,देवा नामदेव पाटील,कैलास सुकलाल पाटील,जगन्नाथ रामदास पाटील,योगेश सुरेश पाटील व धनराज रामदास पाटील व श्रीराम भजनी मंडळ वाघाडी व गावातील समाजबांधवांनी प्रयत्न केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने