धुळे - महाराष्ट्र राज्य युवा शिवश्री समिती यांच्या यंदाच्या पाचव्या वर्धापनदिननिमित्त यावर्षी विशेष युवा शिवश्री पुरस्काराचे आयोजन करण्यात येत आहे,सदर समिती तर्फे संपूर्ण महाराष्ट्र मधून दरवर्षी एक युवा पुरस्कार देण्याबाबत बैठकीत ठराव करण्यात आला,त्या अंतर्गत महाराष्ट्र मध्ये वय वर्ष २५ च्या आत ज्या तरुणांनी आपल्या सामजिक कार्याची विशेष ओळख निर्माण केली आहे,तसेच त्यांच्या सामाजिक कार्याला प्रेरणा मिळावी,यासाठी युवा शिवश्री पुरस्काराची सुरुवात होत आहे,असे अशी माहिती अध्यक्ष सुरेश दादा काळे यांनी सांगितले, यंदाचा हा शिवश्री पुरस्कार महाराष्ट्रातील धुळे तालुक्यातील युवा विकास चंद्रकांत मराठे यांना जाहीर करण्यात आला,धुळे येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विकास मराठे यांनी सामाजिक कार्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे,आजवर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो,या पुरस्कारासाठी कोणाचीही शिफारस,व प्रस्ताव मागविण्यात येणार नसल्याचे काळे यांनी सांगितले,
विकास मराठे हे सामाजिक,क्रीडा,सांस्कृतिक, वृक्षारोपण, या साठी कार्य करीत आहेत,२०१९ साली राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळवून सर्वांचे लक्ष वेधले होते,त्यांच्या या यशामागे आई,वडील,भाऊ,यांचा खूप मोठा वाटा असल्याचे विकास मराठे यांनी महाराष्ट्र माझा शी बोलताना सांगितले,
Tags
news