वक्तृत्त्व कौशल्यातून बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडते - प्रा.डॉ.कैलास पाटील, आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘वक्तृत्त्व कौशल्य–एक कला’ या विषयावर कार्यशाळा



शिरपूर - आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वक्तृत्त्व कौशल्य–एक कला ’ या विषयावर प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.कैलास पाटील (आर.सी.पटेल माध्य.व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वाघाडी), उपप्राचार्य डॉ. ए.जी.सोनावणे, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.ए.एम.पाटील, समन्वयक डॉ.रमेश जाधव आदी उपस्थित होते.
‘वक्तृत्त्व कौशल्य–एक कला व शास्त्र ’ या विषयावर प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.कैलास पाटील म्हणाले की, ‘वक्तृत्त्व कौशल्य’ ही मूलतः अभ्यास पूर्ण विषयाची उकल करण्यासोबतच श्रोत्यांच्या मानसिक व सामाजिक जाणीवेवर आधारित मांडणीचे कौशल्य असून त्यातूनच बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडते. वक्तृत्त्व किंवा भाषण करतांना विषयाची पद्धतशीर संरचना व प्रासंगिकता, श्रोत्यांचा वयोगट व मानसिकता, विषय विवेचनातील सुलभता व आकलन, वेळेचे नियोजन, उदाहरण दाखल्याचा चपखल वापर, श्रोत्यांचे अवधान टिकवून ठेवण्यासाठी करावयाची योजना तसेच वक्तृत्वाचा समारोप आदी बाबींवर सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
उपप्राचार्य डॉ.ए.जी.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्त्व कौशल्य शिकण्याची गरज असल्याचे नमूद केले. विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ.रमेश जाधव यांनी वक्तृत्त्व कौशल्य कार्यशाळेचे हेतू व महत्त्व सांगून महाविद्यालयात प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी विकास विभाग सातत्याने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यशाळेसाठी ८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ.ए.एम.पाटील, समन्वयक डॉ.रमेश जाधव, प्रा.आर.पी.महाजन, गणेश सोनार, डी.यु,पटेल, बन्सी चौधरी, मेहुल गुजराथी, महेश महाले, युवराज साळवे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने