बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात करोनाविषयी जनजागृती करण्यात आली.यावेळी उपशिक्षक गणेश भामरे,चंद्रकांत बडगुजर,शाखाप्रमुख कल्पना पाटील यांनी विद्यार्थीनींना माहिती दिली.यात करोनाची लक्षणे,होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी,करावयाची उपाययोजना याविषयी माहिती दिली.तसेच परिसरात खोकला,सर्दी,श्वास घ्यायला त्रास होत असेल,ताप,न्युमोनिया इ.लक्षणे दिसल्यास ताबडतोब दवाखान्यात जाण्याचे आवाहन केले.तसेच दिवसभरात वारंवार हात धुवा,श्वसनसंस्थेचे विकार असलेल्या व्यक्तीपासुन लांब रहा,शिंकताना,खोकताना नाकातोंडावर रुमाल धरा,अर्धवट शिजलेले मांस खाऊ नका,भाजीपाला,फळे स्वच्छ धुवुन खा,वैयक्तिक,परीसराची,स्वच्छता ठेवा व घाबरुन न जाता अफवेवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आवाहन केले.यावेळी एन.एम.सोनवणे,टी.टी.ढोले,पी.आर. चव्हाण,बी.एन.ठाकरे,वैशाली पवार,जे.पी.पावरा,निरज निकम इ.उपस्थित होतेसुत्रसंचालन गणेश भामरे यांनी केले.
Tags
news