शिरपूरला ग.स.बॅंक संदर्भात बैठक संपन्न



धुळे-नंदुरबार जिल्हा ग.स.बॅंकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सध्या सुरु असुन 29 मार्च रोजी मतदान आहे.ग.स.बॅंकेचे माजी चेअरमन व किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बॅंकेचे सभासद व इच्छुक उमेदवारांची बैठक किसान विद्या प्रसारक संस्थेत आयोजित केली होती.यावेळी माजी चेअरमन निशांत रंधे,माजी चेअरमन भगवान पवार,शिक्षक संघटनेचे शरद सुर्यवंशी,के.डी.बच्छाव,
निलेश पाटील,जितेंद्र बाविस्कर,छोटु राजपुत,ए.के पाटील,देविदास
निळे,बाजीराव महाले व सर्व प्राथमिक संघटनांचे सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
बॅंकेच्या संचालक पदाच्या  उमेदवारीसाठी संजय पवार,महेंद्र अहिरे बडगुजर,चंद्रशेखर पाटील,शशांक रंधे यांनी फाॅर्म भरला आहे.यावेळी 
सर्वांनी परिचय देवुन मनोगत व्यक्त केले.तसेच
माजी चेअरमन निशांत रंधे यांनी सांगितले की,सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मागिल पंचवार्षिकमध्ये सेवेची संधी मिळाली.याचप्रमाणे या वेळेस चांगले काम करणारे उमेदवार दिले आहेत.त्यांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले.
याप्रसंगी शिक्षक नेते भगवान पवार यांनी बॅंकेच्या हितासाठी चांगले काम करणारे लोकांना संधी दिली आहे.त्यांना निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी  शरद सुर्यवंशी
बाळासाहेब बोरसे यांनी संघटनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी तालुक्यातील शिक्षक संघटनांचे सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.माघार 16 मार्चला,मतदान 29 मार्चला,मतमोजणी 30 मार्च रोजी आहे.याप्रसंगी 
आभार खोंडे यांनी केले तर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर धनगर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने