शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली जय जवान जय किसान हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नुकतेच महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख नामदार माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कर्जमुक्तीच्या अनुषंगाने कर्जमुक्त झालेल्या शिरपूर तालुक्यातील दहीवद, रुदावली, भाटपुरा, टेकवाडे येथिल 30 शेतकऱ्यांच्या भगवी शाल व पुष्प हार देऊन जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुकत्याच भारतीय सैन्यदलात भरती झालेले शेतकरी कुटुंबातील राकेश धनगर ,मांजरोद, शुभम चधनगर थाळनेर, हेमंत चव्हाण दहीवद, विजय भिल उंटावद यांच्या देखील सन्मान जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्या प्रमाणे शिवरायांनी रयतेचे गोरगरीबांचे राज्य निर्माण केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी रयतेचे गोरगरिबांची राज्य निर्माण प्रयत्न केला आहे. अलीकडचे सरकार सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले काळात शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी व लोकोपयोगी निर्णय कल्याणकारी सरकारची प्रतीक आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले तालुकाप्रमुख भारत राजपूत म्हणाले की सीमेवर जवान आपल्या देशातील लोकांची दिवस रात्र सेवा करतात त्याचप्रमाणे त्यात प्रमाणे अहोरात्र परिश्रम करून शेतकरी हा जनतेला अन्नधान्य देतो म्हणून शिवरायांच्या जयंतीनिमित्त जवान आणि किसान सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करणे यापेक्षा मोठा शिवरायांच्या जयंती उत्सव असू शकत नाही म्हणून आज जय जवान जय किसान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला,. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे जिल्हा संघटक मंगेश पवार, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू टेलर, उपजिल्हाप्रमुख हिम्मत महाजन ,तालुकाप्रमुख भरत राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर ,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत, उपजिल्हा संघटक विभा जोगरणा, भाईदास अण्णा, तालुका संघटक मुकेश शेवाळे ,उपतालुका प्रमुख राजेश गुजर, अभय ब
भदाने संदीप,संदीप कुमावत ,सुनील सूर्यवंशी मंगल सिंह भोई, उपशहर प्रमुख योगेश ठाकरे ,बंटी लांडगे ,विकास महिला महाराष्ट्र वाहतूक सेनेचे नन्ना जाधव ,दिनेश गुरव ,शिवसेने वाहतूक सेनेचे अनिकेत बोरसे, मन्सूर शेख, रियाज काजी, देवा बंजारा, सोमा पाटील ,पदमसिंह जाधव ,युवा सेनेचे सचिन शिरसाठ ,चेतन बंजारा तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी उपतालुकाप्रमुख योगेश सूर्यवंशी विभाग प्रमुख दीपक चोरमले ,कुबेर जमादार ,आतरसिंग पावरा विकास,विकास सेन यांनी परिश्रम घेतले.
Tags
news