शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा ते आराळे रस्त्याची दयनीय अवस्था, प्रशासन कोमात, दैनंदिन कामकाजासाठी नागरिक हैराण



शिंदखेडा -  सरकार कोणाचेही असो अथवा आमदार खासदार कोणी असो, शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा ते आराळे व  गाव परिसरातील नागरिकांना काही फरक पडत नाही. मागील दहा वर्षांपासून  गाव परिसरातील नागरिकांची समस्या सोडवण्याच्या प्रयत्न केलेला नाही अशी लोकांची तक्रार आहे. आदिवासी भागात देखील एवढी दयनीय अवस्था नसेल इतकी दयनीय अवस्था शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा ते आराळे या गावांना जोडणारा रस्त्याची झाली आहे. रस्ता अत्यंत नादुरुस्त असून यावरून प्रवास करणे जीव घेणे झाले असून मोटरसायकलने देखील प्रवास करणे अशक्य झाले आहे रस्त्याची इतकी दयनीय वाईट परिस्थिती असतानादेखील नागरिकांनी वारंवार मागणी करून आणि तक्रारी करून देखील प्रशासन याबाबत गांभीर्याने घेत नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून हा अतिशय खराब अवस्थेत असून यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासन अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर नवनिर्माण किंवा दुरुस्तीत करत नसल्यामुळे शेतीकामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना शहरी भागात जाण्यासाठी अथवा रात्री पहाटे दवाखान्यात जाण्यासाठी मार्गच उपलब्ध नसल्यामुळे या जीवघेण्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्या मध्ये वाढ झाली असून गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची नवनिर्मिती करावी अशी मागणी पुढे येत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत करोडोंची कामे होत असतात, धुळे जिल्ह्यात देखील शिंदखेडा तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत कामे केली जात असतात, दरवर्षी रस्ते निर्मिती दुरुस्ती देखभाल आणि  झोनल कार्यक्रम माध्यमातून  शासन करोडो रुपयांचा खर्च करत असतो. कदाचित या रस्त्यावर देखील मागील काही वर्षात दुरुस्तीच्या नावाने खर्च टाकण्यात आला असेल आणि त्याची बिले देखील पास झाली असतील मात्र प्रत्यक्षात रोडवर हा खर्च करण्यात आलेला नाही असादेखील प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याचे नेमके झाले काय आणि त्याची दुरुस्ती का होत नाही याबाबत शोध घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे या रस्त्यावर काम झालेच नाही तिथे फक्त कागदावर झाले याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किमान आतातरी या भागातील लोकप्रतिनिधींनी जागृत होऊन  त्वरित या रस्त्याची देखभाल दुरुस्तीचे काम करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने