महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील
शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग 31 मार्चपर्यंत बंद
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, खासगी शिकवणी वर्ग तसेच महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था 14 ते 31 मार्च 2020 या कालावधीत बंद ठेवण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी धुळे जिल्ह्यातही परदेश प्रवास करून आलेले आहेत. बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रण व ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी वरील आदेश दिले आहेत. त्यानुसार ‘कोरोना’ विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा तसेच महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्गमित केलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी शाळा, खासगी शिकवणी वर्ग तसेच महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. मात्र, दहावी व बारावी तसेच विश्व विद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही याची आवश्यक ती खबरदारी व दक्षता संबंधित संस्थाप्रमुख, यंत्रणांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
धुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या
31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व अंगणवाड्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये निर्गमित केलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार धुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी धुळे जिल्ह्यातही परदेश प्रवास करून आलेले आहेत. बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रण व ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी वरील आदेश दिले आहेत.
00000
वृत्त क्रमांक : 121
चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळांसह
नाट्यगृहे 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ या विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धुळे जिल्ह्यातील चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा आणि नाट्यगृहे 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी धुळे जिल्ह्यातही परदेश प्रवास करून आलेले आहेत. बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रण व ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा व नाट्यगृहे 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.
00000
मेळावे, यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमासह
क्रीडा स्पर्धांवर 31 मार्च 2020 पर्यंत बंदी
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : ‘कोरोना’ या विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह एकत्र जमू न देण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, दिंड्या, पदयात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांवर 31 मार्च 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे, आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन व देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. असे प्रवासी धुळे जिल्ह्यातही परदेश प्रवास करून आलेले आहेत. बरेच प्रवासी परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेवून त्यावर तत्काळ नियंत्रण व ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. अशा प्रवाशांमुळे ‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे आदी बाबी टाळणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी वरील आदेश लागू केले आहेत. धुळे जिल्ह्यातील जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे आदी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुजारी किंवा धर्मगुरूंना विधीवत पूजा करण्यास किंवा परंपरेने करावयाचे कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यास बंदी असणार नाही. तसेच खासगी कार्यक्रम फक्त कौटुंबिक स्वरुपात करण्यास बंदी असणार नाही. मात्र, या दोन्ही बाबतीत सर्व वैद्यकीय सुरक्षा पाळणे संबंधितांवर बंधनकारक राहील. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रासाठी तालुक्याचे तहसीलदार, तर नगरपरिषद क्षेत्रासाठी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रामध्ये संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व धुळे शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आयुक्त, धुळे महानगरपालिका यांची त्यांच्या क्षेत्रातील अशा कार्यक्रमांसाठी लेखी पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
याशिवाय सर्व विभागांनी सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आदींच्या आयोजनासंदर्भात कोणतीही परवानगी त्यांच्यास्तरावरुन देवू नये. तसेच यापूर्वी परवानगी दिली असल्यास सदरची परवानगी रद्द करावी. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संबंधित मुख्याधिकारी, नगरपरिषद व नगरपंचायती, आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या अशा कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच फक्त विधीवत पूजा किंवा कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार कारवाईसाठी संबंधित क्षेत्रात तेथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मुख्याधिकारी, आयुक्तांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
मास्क आणि औषधांची विक्री
शासन निर्धारित दरानेच करावी
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :धुळे जिल्ह्यात सद्य:स्थितीत ‘कोरोना’ या विषाणूच्या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यानंतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मास्कची मागणी वाढून साठेबाजी व जास्त दराने मास्क विक्रीच्या घटना घडू नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मास्क व औषधांची विक्री शासन निर्धारित दराने होईल याची दक्षता बाळगावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे, शासनाने सामान्य नागरिकांना मास्क वापरण्याची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले आहे. ज्यांना ‘कोरोना’ विषाणू बाधित आजाराची लक्षणे असतील, अशाच लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. या काळात मास्कची मागणी वाढून साठेबाजी व जास्त दराने मास्क विकण्याच्या घटना घडू शकतात. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
‘कोरोना’विषयी अफवा पसरविणाऱ्यांविरुध्द
सायबर सेलच्या माध्यमातून कार्यवाही करा
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :‘कोरोना’ या विषाणूसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा, गैरसमज परसविणाऱ्यांविरुध्द सायबर सेलच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी पोलिस अधीक्षक, धुळे यांना दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे, केंद्र सरकारने चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांमधून नागरिकांना व प्रवाशांना क्वारंटाइन (Quarntine) करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार परदेशातून आलेले नागरिक ज्या नातेवाईकांकडे मुक्कामास आहेत किंवा हॉटेल, रिसॉर्टमध्ये मुक्कामास आहेत त्यांची माहिती घ्यावी. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा शल्य चिकित्सकांना द्यावी. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना सदरचे कार्यक्रम आयोजित करू देवू नयेत, असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे.
00000
आपत्ती व्यवस्थापन समितीची
तालुकास्तरावर तत्काळ बैठक घ्यावी
: जिल्हादंडाधिकारी गंगाथरन डी.
धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुके, उपविभागीयस्तरावर तत्काळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बोलवावी, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय कृती आराखडा तयार करावा. तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करावी. यासंदर्भात मदतीची आवश्यकता भासल्यास जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी 02562- 288066 ववा राज्य नियंत्रण कक्षाशी 104 या टोली फ्री क्रमांकावर 020- 26127394 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती घ्यावी. ती या कार्यालयास व जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी. तसेच नागरिकांमध्ये ‘कोरोना’विषयी असलेले गैरसमज दूर करावेत. अधिक माहितीसाठीhttp://www.mhofw.gov.in व htpp://www.who.int/
00000