परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश सहसचिवपदी : अशोक सपके



शिरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाची त्रैमासिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथे समाजाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांचा अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत औरंगाबाद येथील समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार, जुने जाणते व धडाडीचे कार्यकर्ते अशोक आत्माराम सपके यांची परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
  अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचाशी विचार विमर्श करुन प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी यावेळी अशोक सपके यांची प्रदेश सहसचिवपदी निवड जाहिर करुन नियुक्तीपत्र दिले. याप्रसंगी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, कोअर कमेटी प्रदेशाध्यक्ष किसनराव जोर्वेकर, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी,  तंटामुक्ती समिती प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, महिला मंडळ  प्रदेश उपाध्यक्षा सौ. अरुणाताई जोर्वेकर आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
     अशोक सपके हे गेली पंचवी ते तीस वर्षापासुन समाजाचे काम जिद्दने व निष्ठेने करीत असुन त्यांनी आतापर्यंत तालुका स्तरापासुन जिल्हा, विभाग व प्रदेशाचे विविध जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. संत गाडगे बाबा जयंती व पुण्यतिथी, समाजाचे विभागिय वधुवर मेळावे असोत कि प्रदेश पातळीच्या बैठका असोत सतत हिरीहिरीने सहभाग घेवून समाज कार्यास हातभार लावीत असतात.
   अशोक सपके यांच्या या निवडीने धुळे जिल्हातील जि. प. अध्यक्ष तुषार रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ महिला माजी प्रदेशाध्यक्षा श्रीमती. आशाताई रंधे, डाॅ. प्रा. सौ. रजनीताई लुंगसे, प्रदेशाध्यक्षा सौ. सिमाताई रंधे, कि. वि. प्रसारक संस्था सचिव निशांत रंधे, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, नगरसेवक रोहित रंधे, परिट (धोबी) सेवा मंडळ तंटामुक्ती समिती प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सदाशिव ठाकरे, ज्येष्ठ नेते व्ही. व्ही. दिघे, सुरेश कुवर, वसंत सुर्यवंशी, धुळे जिल्हाध्यक्ष अमृत कुवर, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर येशी, शहर उपाध्यक्ष नरेश पवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, लाॅन्ड्री धारक संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोरसे, युवक शहराध्यक्ष योगेश धोबी, उमेश खैरनार, भगवान वाघ, महेंद्र येशी, राजेंद्र येशी, दिलीप येशी आदिंनी अभिनंदन केल. सपके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने