महाराष्ट्र शिक्षक संघटना शिरपूर तालुक्याचे अधिवेशन बोराडी येथील छत्रपती शाहु महाराज सभागृह येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नविनचंद्र भदाणे होते तर,प्रमुख पाहुणे म्हणून धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,शिरपूर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे,स.बॅंकेच्या माजी संचालक शोभा पवार,शिक्षक संघटनेचे राज्यकोषाध्यक्ष रामराव पाटील,राज्यउपाध्यक्ष डी.डी.महाले,नरेंद्र देवरे,राज्यप्रसिद्धीप्रमुख किरण बेडसे,विश्वनाथ सोमवंशी, जिल्हासरचिटणीस
मुकेश बाविस्कर,जिल्हाकार्याध्यक्ष,यो गेश धात्रक,कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे,प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष देविदास निळे,साक्रीचे पावबा बच्छाव,शिंदखेड्याचे नितिन सास्के,एल.एम.पवार, प्रकाश पवार इ.उपस्थित होते.यावेळी शिरपूर तालुक्याची कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात अध्यक्षपदी संजय पवार,सरचिटणीस ज्ञानेश्वर डोळे,कार्याध्यक्ष धरमसिंग पावरा,कोषाध्यक्षपदी अरविंद नकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.प्रास्ताविकात प्रभाकर मेटकर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणांची माहिती देऊन आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला.
यावेळी डाॅ.तुषार रंधे यांनी सांगितले की,समाज शिक्षकांच्या माध्यमातून घडतो म्हणून समाजही शिक्षकांकडे सन्मानाने पाहतो.ग्रामीण,दुर्गम भागात शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत हे खरोखर कौतुकास्पद आहे.जोपर्यंत समाज शिक्षित होणार नाही,तोपर्यंत समाजात बदल घडणार नाही.शिक्षक माध्यमाचे काम करत आहे.छाईल सारखी ग्रामीण भागातील शाळा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे हे शिक्षकांचे योगदान आहे.शिक्षक संघटना अतिशय चांगले काम करीत आहेत.त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवा.असे सांगून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.
निशांत रंधे यांनी सांगितले की,शिक्षकांचा व माझा ऋणानुबंध कायमचा आहे.शिक्षक ज्ञानदानाचे महत्त्वाचे काम करीत आहेत.संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडवीले जात आहेत.शिक्षण पद्धतीय अमुलाग्र बदल घडत आहे.त्यामुळे गुणवत्ता वाढत आहेत.ग.स.बॅंकेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.बॅंकेच्या चांगल्या भवितव्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.
रामराव पाटील यांनी सांगितले की,धुळे जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आधी डिजिटल झाला याचे सर्व श्रेय शिक्षकांनाच आहे.विद्यार्थ्याच्या उपस्थिती बरोबर गुणवत्तेकडेही प्रयत्न केले,म्हणून मराठी शाळेकडे विद्यार्थी वळत आहे.गेल्या काही वर्षांत शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी वळत आहेत असे प्रतिपादन केले
अध्यक्षीय भाषणात नविनचंद्र भदाणे यांनी संघटनेच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत होत आहेत.चांगले करीत असलेल्या शिक्षकांना संघटनेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येते.यामुळे काम करण्यात उत्साह येतो.भविष्यात सुद्धा संघटनेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येतील.
यावेळी जाणता राजा पुरस्कार प्राप्त शिक्षक अनिल महिरराव व मनोहर चौधरी यांचा सत्कार डाॅ.तुषार रंधे यांच्याहस्ते करण्यात आला.
या अधिवेशनसाठी गजानन जाधव,प्रभाकर मेटकर,अनिल महीरराव,भरत चौधरी,रमेश पाटील,उपस्थित होते.अधिवेशनसाठी जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल पाटील,उपेंद्र पाटील,विश्वास शिरसाठ,जागृती निकम,नंदा पवार,विजय पाटील,सुनिल पाटील,संदीप पवार,रविंद्र शिंदे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर प्रभाकर मेटकर यांनी आभार मानले.
Tags
news