होळनांथे येथे शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक



होळनांथे व अजंदे बु येथील शिवजयंती उत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सवादय मिरवणूक काढण्यात आली.
सदर कार्यक्रमास शिरपुर नगर पालिकेचे नगरसेवक तपनभाई पटेल, शिरपुर पंचायत समितीचे उपसभापती योगेश बोरसे, जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजय पाटील, अजंदे बुचे सरपंच चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच तुळशीराम मराठे, सेवानिवृत्त एपीआय मधुकर भोई, आई जोगेश्वरी संस्थेचे अध्यक्ष प्रविण पाटील, प.स. सदस्य जितेंद्र पवार, नांथे सरपंच जयपाल राजपूत, होळ ग्राम पंचायत सदस्य पदमा चव्हाण,तनवीर शिंपी, अजंदे ग्रा.प.सदस्य ओमेंद्रसिंग राजपूत, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष जाकीर खाटीक, संत रविदास मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती .मिरवणुकीत होळनांथे व अजंदे बु येथील शिवप्रेमींची मोठी उपस्थिती होती

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने