शिरपूर: (प्रतिनिधी) तालुक्यातील भटाणे येथे जागतिक महिलादिनानिमित्त लुपिन फाउंडेशन धुळे तर्फे प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, त्याप्रसंगी उपस्थित शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी आर. डी. मोरे ,नाबार्ड बँकेचे अधिकारी विवेक पाटील,निलेश पवार, संदीप झनझने आणि इतर कर्मचारीवृंद आणि महिला शेतकरी, लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊन्डेशन, धुळे, तर्फे BCI, GIZ यांच्या संयुक्त विद्यमाने भटाणे (ता.शिरपूर) येथे “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला त्याप्रसंगी शिरपूर परिसरातील जवखेडा, अर्थे बुII, उंटावद, वाघाडी, बलकुवे, विखरण, भटाने येथील महिला शेतकऱ्यांनी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊन्डेशन, धुळे तर्फे राबविण्यात येत असलेल्या सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्पा (BCI) तसेच GIZ तर्फे सौ. सुनीताबाई कमलेश पाटील, विखरण, सौ. वंदनाबाई ज्ञानेश्वर पाटील, भटाने, सौ. सुरेखाबाई ज्ञानेश्वर पाटील, अर्थे बु, सौ. मनिषाबाई संजय गिरासे, भटाने यांना प्रोत्साहनपर “शेतकरी सुरक्षा कीट” देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी आर. डी. मोरे आणि नाबार्ड बँकेचे अधिकारी विवेक पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. लुपिन फाउंडेशनचे निलेश पवार, संदीप झनझने, पियु व्यवस्थापक दिनेश पाटिल , कृषिमित्र देवेंद्र करंके संदीप पाटील , अक्षय पाटील सीमा पाटील आणि महिला शेतकरीवृंद उपस्थित होते.
Tags
news