शिरपूर - आर. सी. पटेल संकुलातील क्रीडा शिक्षक मनोज साहेबराव पाटील यांना नुकताच राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.सदर पुरस्काराचे वितरण दोंडाईचा येथे अर्जून पुरस्कारार्थी काका पवार व शिक्षण संचालक दिनकरराव पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाच्या संकल्पनेतून, धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ व हस्ती पब्लीक स्कूल, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शारीरिक शिक्षण शिक्षकांनी घडविलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर आधारीत गुणांकनावर देण्यात येणारा महाराष्ट्राचा एकमेव "शांती-कांती" राज्य आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण हस्ती भवन दोंडाईचा जि.धुळे येथे 15 मार्च 2020 वार रविवार रोजी संपन्न होत आहे.त्यांचे पुरस्कार बद्दल संस्था अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, कमलकिशोर भंडारी, गोपाल भंडारी, संस्था सीईओ डॉ. उमेश शर्मा, क्रीडा संचालक प्रितेश पटेल, प्राचार्य सिद्धार्थ पवार, शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, उपाध्यक्ष आनंद पवार, सचिव राजेश जाधव, जिल्हाध्यक्ष साळुंखे सर, प्राचार्य पी. आर.साळुंखे, जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना, धुळे शहर, धुळे तालुका, साक्री तालुका, शिंदखेडा तालुका, शिरपूर तालुक्यातील सर्व सदस्य यांनी कौतुक केले.तसेच शिरपूर तालुक्याचे माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
राज्यभरातून 109 प्राप्त प्रस्तावातून छाननी करून गुणांकन आधारे पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून हस्ती पब्लीक स्कूल दोंडाईचा वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष आनंद पवार, हस्ती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष कैलास जैन, जिल्हाध्यक्ष डी.बी.साळुंके, सुनील सुर्यवंशी, मयुर ठाकरे यांनी दिली.
Tags
news