धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे गुरुवारी दि. 12 मार्च रोजी अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन




धुळे - धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठीभारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दि. 12 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.धुळे येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस, गुरुद्वारा मागे, मुंबई आग्रा महामार्ग, येथे गुरुवारी दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने