मुंबई ( शैलेश सणस / गणेश हिरवे )ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फाॅर द फीजीकली हॅन्डीकॅप, मुंबई या संस्थेचे संस्थापक व अपंग, कुष्ठरोगी यांना स्वाभिमानाने स्वावलंबी जीवन जगण्याचा रस्ता दाखवणारे आदरणीय तुकाराम पांडुरंग मिरजकर यांचा नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव हितवर्धक मासिक, संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कलाप्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे रविवार दि. 8 मार्च 2020 रोजी 91 वर्षात पदार्पण केलेबद्दल मा. चंदू बोर्डे व श्री. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, पुष्पहार व मानपत्र देवून फार मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना चंदू बोर्डे म्हणाले की, तु. पा. मिरजकर यांनी कै. श्री. अजित वाडेकर याच्या समवेत अपंगाकरीता ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फाॅर द फीजीकली हॅन्डीकॅप, मुंबई या संस्थेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय पातळीवर अपंगाकरीता प्रथमच दिव्यांग स्पर्धा सुरू केल्या. नुकतीच अपंगाच्या क्रिकेटच्या टिमने गेल्या वर्षी वर्डकप जिंकला असून ते आम्हालाही शक्य झाले नसल्याचे चंदू बोर्डे यांनी सांगितले. तसेच टी. पी. मिरजकर यांनी Prosthetic & Orthatic कोर्स सुरू करून अपंगाना लागणारी सर्व प्रकारची उपकरणे भारतात बणवण्यासाठी व्यवसायिक शिक्षण देवून स्वावलंबी केले असून देशाच्या कानकोप-यात तु.पां. मिरजकर यांचे आज हजारो विद्यार्थी Hospital Rehabilitation Dept. मध्ये कार्यरत असल्याचे सांगितले.
यावेळी श्री. स्वामी स्वरूपानंद सरस्वती, म्हणाले की, तु. पां. मिरजकर यांनी आपल्या 91 वर्षाच्या कारकिर्दीमध्येे अपंग, कुष्ठरोगी, शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केले असून ते कार्य आजही सुरू आहे याचे मला आश्चर्य वाटते. कारण दोन दिवसापूर्वी मिरजकर यांचा स्पेसमेकर बदलला असून केवळ आत्मविश्वास यामुळेच ते आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत. व असे चिरतरूण व्यक्तिमत्व पाहायला मिळाल्या याचा आनंद मला होत आहे. कारण आत्मविश्वासाच्या जोरावर आपण अशक्य असणारी गोष्ट सहज शक्य करू शकतो हे आज मिरजकर यांचेवरून दिसून येत आहे असे मत व्यक्त केले याचबरोबर त्यांनी परदेशात जावून भारतातील पहीले बायोमेडीकल इंजिनिअर पदवी संपादन केली.व भारतात परत आलेवर Prosthetic & Orthatic या विषयातील शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठ याच्या संयुक्त विद्यमाने सर्टिफिकेट कोर्स, पदविका, पदवी, बी.एस.सी. व एम.एस.सी. कोर्सेस सुरू केले. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स,डेन्मार्क, ब्रिटन या देशात 6 वेळा प्रतिनिधीत्व करून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रबंध सादर करूनं भारताचे नांव उज्वल केले व
डॉक्टर गणपती यांच्यासमवेत मुंबई कुष्ठरोगी प्रकल्प या संस्थेत 12 वर्षे कुष्ठरूग्णांसाठी काम केले. व सामाजिक कार्यातही बरोबर राहून नामदेव हितवर्धक मासिक संस्थेचे संस्थापक असून 56 वर्षे संपादक व सध्या मुख्य मार्गदर्शक म्हणून आजही कार्यरत आहेत व नामदेव समाजोन्नती परिषद या राज्यस्तरीय संघटनेमध्ये 15 वर्षे विश्वस्त व 10 वर्षे मुख्य विश्वस्त म्हणून कार्य केले असून नासप या राज्यस्तरीय संघटनेचा पहिला जीवन गौरव पुरस्कार, अपंग कल्याणकारी सेवा पुरस्कार व संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच वैयक्तिक विशेष म्हणजे वयाच्या 7 वर्षापासून 76 वर्षापर्यंत सातत्याने 70 वर्षे सलग पंढरीची वारी पूर्ण केली असून 100 हून अधिक वेळा रक्तदान केले असल्याची माहिती मासिकाचे संपादक चंद्रकांत सारंगधर यांनी दिली.
या कार्यक्रमास ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फाॅर द फीजीकली हॅन्डीकॅप मुंबई व पुणे येथील पदाधिकारी तसेच मुंबई, कोल्हापूर, .रायगड, रत्नागिरी, नांदेड, सातारा, सोलापूर, नाशिक, कोकण, विदर्भ, मराठवाडा व पुणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ज्ञातीसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय नेवासकर, संदीप लचके, सुरेश वनारसे , राजकिशोर सुपेकर सुभाष मुळे, बापुसो बोत्रे व दिगंबर क्षीरसागर व नामदेव समाजोन्नती परिषद व नामदेव हितवर्धक मासिक संस्थाचे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले