दोंडाईचा पोलिसांची धडक कार्यवाही,७ लाख १७ हजार ७७२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त




दोंडाईचा
शहरातील व मालपुर चौफुलीवर पोलिसांनी दोन कारवाई करत दोन संशयतांसह सुमारे सात लाखांची देशी-विदेशी दारू जप्त केली आहे. 
सकाळी १०.४५ वजेच्या सुमारास दोंडाईचा शहरातील मालपुर चौफुलीजवळ एमएच-एफ-४६८१ क्रमांकाची मोटरसायकल दोंडाईचा पोलिसांनी पकडली असून मोटारसाकल चालक वसंत महारु ईशी रा.विखरण ता. शिंदखेडा हा विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून दारूसह ३४ हजार १८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
त्यानंतर अवघ्या दोन तासांनी १२.४५ वाजरच्या सुमारास दोंडाईच्या पोलिसांनी नंदुरबार चौकीजवळ बोलेरो १८ एजे ०९९५ क्रमांकाची गाडी थांबवून तपासणी केली असता त्याच्यामध्ये १ लाख ८३ हजार ८४ रुपयांच्या देशी-विदेशी दारू आढळून आले पोलिसांनी बोलेरो सह ६ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी दलविर देवसिंग चव्हाण वय ३२ रा. सुंदरदे ता. नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आला.या दोन्ही कारवायांमध्ये ७ लाख १७ हजार ७७२ रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पी.जे.राठोड, पीएसआय दिनेश मोरे,हेड कॉन्स्टेबल जगदाळे, प्रकाश जाधव,संजय जाधव, सिताराम निकम, विनायक खैरनार, संदीप कदम मुकेश अहिरे यांनी कारवाई केली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने