शिरपूर - शिरपूर शहर पोलिसांची धाडशी कारवाई करत काल दि 11 रोजी रात्री 8ते 9 च्या सुमारास शिरपूरपुरातील वाघाडी गावाजवळ सापळा रचून दारू ने भरलेला आयशसर truk सह 14 लाखांचा मुद्देमाल व 3 आरोपी पकडले आहेत.
या बाबत शिरपूर पोलिसांना गुप्त बातमीदार यांच्या कडून खबर मिळाली होती की दारूने भरलेली आयशर गाडी या रोड वरून पास होणार आहे. या नुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उप विभागीय पोलीस अधिकारी ए व्ही माने यांनी एक पथक तयार करून सापळा रचला होता या वेळी हरयाणा कडून गुजरात राज्याकडे जाणारी आयशर गाडी up 21 bn 3473 ला अडवले असता त्यात हीट ब्रँड असलेले दारू चे जवळपस 800 खोके व एका खोक्यात 48 बॉटल या प्रमाणे अंदाजित 8 लाख रुपयांचा माल व वाहन अंदाजित किंमत 6 लाख असा एकूण 14 लाख रुपयांचा मुद्दे माल पोलिसानी जप्त केला आहे.
यात 3 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक मा चिन्मय पंडित ,उप अधीक्षक राजू भुजबळ सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उप विभागीय पोलीस अधीकारी ए व्ही माने व पथकातील पोलीस कर्मचारी स्वप्नील बांगर, अमित दुसाने,व सहकारी यांनी केली आहे.
शिरपुरात पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पदभार स्विकरल्यानंतर धडाकेबाज कामगिरी सुरू केली असून तालुक्यात अनेक वर्ष नंतर कायद्याचे राज्य आले आहे या बाबतीत नागरिकांनी समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे