शिरपूर- माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या मार्च 2020 च्या अर्थसंकल्पात शिरपूर शहरासह तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी, संरक्षक भिंत व लहान पुलांसाठी एकूण 12 कोटी 45 लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे.
माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व
शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे.
तळोदा प्रकाशा शहादा शिरपूर रस्ता रा मा 4 किमी (भाग वरूळ ते विखरण, भरवाडे फाटा) मध्ये सुधारणा करणे 2 कोटी रुपये, तळोदा प्रकाशा शहादा शिरपूर रस्ता रा मा 4 किमी (भाग वाघाडी ते शिरपूर) रुंदीकरणासह सुधारणा करणे 2 कोटी रुपये, थाळनेर भाटपुरा नागेश्वर मंदिर रस्ता रा मा 16 किमी 137/200 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 2 कोटी 50 लक्ष रुपये, थाळनेर भाटपुरा नागेश्वर मंदिर रस्ता रा मा 16 किमी 134/850 मध्ये संरक्षण भिंतीसह सा. क्र. 135/00 मध्ये जलनिस्सारणाचे काम करणे 70 लक्ष रुपये, सावळदे उंटावद करवंद लौकी हाडाखेड रस्ता प्रजिमा 7 किमी 0/00 ते 2/00 व 5/00 ते 5/200, 16/500 ते 21/00 (भाग सावळदे ते उंटावद व लौकी ते हाडाखेड) मध्ये सुधारणा करणे 1 कोटी 50 लक्ष रुपये, बोराडी वाघाडी जातोडे बाळदे गिधाडे रस्ता प्रजिमा 2 किमी 10/500 ते 14/00 व 14/500 ते 16/00 (भाग वाडी ते वाघाडी) मध्ये सुधारणा करणे 1 कोटी 75 लक्ष रुपये, बोराडी ते न्यू बोराडी उमर्दे वकवाड पळासनेर रस्ता प्रजिमा 5 किमी 8/400 ते 10/600 मध्ये 3.75 मी चे 5.50 मी ला रुंदीकरण करणे (भाग उमरदे ते वकवाड) 1 कोटी रुपये, शिरपूर आढे थाळनेर होळनांथे बभळाज रस्ता प्रजिमा 12 किमी (भाग राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 ते आढे, थाळनेर ते मांजरोद, घोडसगाव ते होळनांथे ते रा मा) मजबुतीकरणासह नूतनीकरण करणे 1 कोटी रुपये असे एकूण 12 कोटी 45 लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रात रस्त्यांसाठी 12.45 कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर
byMahendra Rajput
-
0