शिरपूर - दि शिरपुर एज्युकेशन सोसायटी संचलित शहरातील अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल मध्ये 'सिंग अलाँग विथ पॅरेंट्स' कार्यक्रम हा पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांचा पालकांसोबत कविता गायन मार्गदर्शक कार्यक्रम पार पडला.लहान मुलांच्या भाषिक कौशल्याचा विकास साधण्यासाठी हा कविता गायनाचा कार्यक्रम शाळेचे प्राचार्य निश्चल नायर व सौ. अनिता थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.हा कार्यक्रम नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनियर केजी या वर्गांसाठी आयोजित करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व पालकांना हावभाव तसेच अभिनयासह कविता गाऊन दाखवल्या. पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Tags
news