स्वाभिमान प्रतिष्ठान व गौरव फौंडेशनातर्फे : नवनिर्वाचित जि.प. अध्यक्ष तुषार रंधे यांचा सपत्निक सत्कार




शिरपूर शहरातील प्रसिद्ध व्यापारी चंदनमलजी सांडेचा यांचा ६३ वा वाढदिवस साजरा

  *निर्भिड विचार / रोनक जैन , शिरपूर*


शिरपूर : शहरातील हाऊस कँफे रिसोर्ट ला बोराडी येथील व विखरण गटातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेले तुषार रंधे यांची धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाल्याचे भाग्य आपल्या बोराडीगावासह शिरपूर तालुक्याला मिळाल्याचे आभिमानास्पथ कौतुक स्वाभिमान प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विजय बाफना यांनी प्रतिपादातून केले आणि आज धुलिवंदनाच्या दिवशी स्वाभिमान प्रतिष्ठानाच्या छोट्याशा स्नेह संमेलनाचे औचित्य साधून जि.प.अध्यक्ष तुषार रंधे यांना सपत्निक आमंत्रित करण्यात आले यावेळी तुषार रंधे  यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जेष्ठ मंडळी , महिला वर्गांनी तसेच शहरातील स्वाभिमान प्रतिष्ठान व गौरव फौंडेशनातील परिवार सदस्यांनी रंधे व श्रीमती सीमा रंधे यांचा सपत्निक तोंडात पेढा भरवून सत्कार केला तद्नंतर शहरातील प्रसिद्ध व्यापारी चंदनमलजी सांडेचा यांच्या ६२ व्या वाढदिवसाला निरोप देऊन ६३ व्या वाढदिवसाला स्वाभिमान प्रतिष्ठानातर्फे विजय बाफना यांनी सांडेचा यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या स्नेह संमेलनात सुरूची भोजनाचे अस्वाद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला याप्रसंगी भागचंद बाफना , चंदनमल सांडेचा , कमल भंडारी , अर्जुन चौधरी , गौरव फौंडेशन चे अध्यक्ष एम.के.भामरे , मोतीलाल शर्मा , नाना राजपूत , दिलीप माळी , दिलीप बाफना , रमेश बाफना , अशोक बाफना व स्वाभिमान प्रतिष्ठानाचे अध्यक्ष विजय बाफना , प्रविण राखा , मनोज संकलेचा , छोटू मिस्तरी , अमोल पाटील , मोहसीन बोहरी , पत्रकार ललित कोचर , हुजैफर बोहरी , राजेंद्र वाणी , तुषार सांडेचा ,निखिल सांडेचा , मयुर बाफना , डॉ. मयुर जैन , दिनेश कदम , पंकज बाफना व बळसाणे गावाचे पत्रकार गणेश जैन रोनक जैन याच्या सह महिला वर्ग तसेच बालगोपाल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी साठी एस कुमार , मुकेश बाफना , परेश बाफना तसेच स्वाभिमान प्रतिष्ठानाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने