क्षणभर विश्रांती सोशल फांऊंडेशन(रजि) महा/१५६०/२०१८/ठाणे आयोजीत एक होळी...बालभवनात...तसेच जागतिक महीला दिन हा उपक्रम



क्षणभर विश्रांती सोशल फांऊंडेशन(रजि)
महा/१५६०/२०१८/ठाणे आयोजीत एक होळी...बालभवनात...तसेच जागतिक महीला दिन हा उपक्रम रविवार दि.०८ मार्च २०२० रोजी पारस बालभवन(वंचित निराधार बालक सेवा कार्य) टिटवाळा येथे साजरा करण्यात आला.
---------------------------------------
 टिटवाळा ( शैलेश सणस )या प्रसंगी तेथील ५० मुलांना पुरणपोळ्यांचा अल्पोपहार देण्यात आला.त्या मुलांबरोबर संस्थेच्या सभासदांनी हळदीने होळी साजरी केली तसेच त्यांच्यासोबत नृत्य देखील केले.तेथील मुलांनी गाणी म्हणुन दाखवीली.संस्थेच्या सभासद स्मिता बागवे यांनी त्या मुलांसाठी ससा ससा कापुस जसा हे गाणे गाऊन मुलांचे मनोरंजन केले.त्या मुलांसाठी तेथील गरज जाणुन घेऊन धान्यवाटप केले.

बालभवनाच्या संचालिका सौ.संगिता गुंजाळ ज्यांना तीथे आवडीने माई संबोधिले जाते त्यांनी बालभवनाचा आजवरचा प्रवास कसा झाला याची माहीती दिली.त्या मुलांवर त्यांनी केलेले संस्कार पाहुन संस्थेचे सर्व सभासद त्यांच्यासमोर नतमस्तक झाले.

माईंचे हे कार्य लक्षात घेता व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन क्षणभर विश्रांती सोशल फाउंडेशन ने त्यांचा क्षणभर विश्रांती अॅडमीन सौ.वर्षा मोरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ तसेच सन्मानपञ देऊन सत्कार केला.तसेच माईंच्या हस्ते आजवर क्षणभर विश्रांती साठी काम करणार्‍या सर्व महिला सभासदांचा सन्मानपञ देउन सत्कार करण्यात आला.

प्रसाद पवार,एकनाथ दुदवडकर,सतीश गुजर,वर्षा मोरे,भाव्या पवार,मानसी मोने,प्रणाली गावकर,स्मिता बागवे,दिनेश परब,अपर्णा परब,सुधिर सकपाळ,रुपेश सावंत,नितीन गोसावी,सौरभ घाग,प्रकाश काळे,हर्ष पांचाळ,निकिता सावंत,निहाल सामंत,प्रमोद दळवी,नम्रता सावंत,काळे सर आदी सभासद उपस्थीत होते.

कै नंदकुमार विष्णु लब्दे यांच्या स्मरणार्थ श्रीमती नम्रता नंदकुमार लब्दे यांनी पुरणपोळ्या आनाथालयातील चिमुकल्या मुलानंकरिता स्वतःच्या हाताने  बनवून दिल्या होत्या.
कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रसाद पवार यांनी केले.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले,त्या सर्वांचे मनापासुन धन्यवाद.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने