अंबरनाथ ( शैलेश सणस )*कोरोना व्हायरस प्रादुर्भाव व संसर्ग टाळण्यासाठी सफाई कामगार ,ज्येष्ठ नागरिक, महिला व रिक्षा चालक यांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत कापडी मास्क वाटप केले*..
यापुढे *वडवली ,ताडवाडी परिसर, वर्षा कॉम्प्लेक्स परिसर, कृष्णा नगर , होलार सोसायटी परिसर ,श्रीराम विद्यामंदिर परिसर, योगायोग सोसायटी व राहुल नगर परिसरातील आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक ,लहान मुले व महिला यांना प्राधान्याने कापडी मास्क मोफत वाटप* करण्यात येणार आहे.
मार्केटमध्ये आवश्यक असणारे मास्कचा अपुरा पुरवठा व चढते दर यामुळे गरजूंना मास्क घेण्याची इच्छा असूनही मास्क मिळत नाहीत ,म्हणून *संवाद महिला बचत गटाच्या व संवाद फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन मास्क शिवून घेण्यात येत आहेत*. मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळे वेळ लागत असून माझ्या विभागातील गरजू व्यक्तींना मोफत मास्क वाटप करण्यात येत आहे व यापुढेही करण्यात येईल.
यासाठी *संवाद फाउंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके* व त्यांची महिला टीम हे काम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
*माननीय मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे ,गर्दीवर नियंत्रण करावे तसेच अबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले* यांना *विशेषता मास्क व sanitiser यांचा पुरवठा किंवा वाटप करून मदत करावी* ,असे केलेल्या आवाहनानुसार *आम्ही सातत्यपूर्ण अशी कामगिरी करीत आहोत*.
*नागरिकांना माझे आवाहन आहे कि आपली काळजी घ्या, सतर्क रहा, कोरोना चा बाऊ न करता सामोरे जाण्यासाठी एकमेकाला मदत करा, स्वतः घाबरू नका इतरांनाही घाबरवू नका. आपले हात सतत स्वच्छ ठेवत जा*.
*कोरोना विषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. काही अडचण आल्यास जवळच्या रुग्णालय, अंबरनाथ नगर परिषद, पोलीस स्टेशन किंवा आमच्याशी संपर्क करावा*.
*चला तर , कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज होऊया व सतर्क राहूया*....