भडणे पोलीस पाटील युवराज बागुल स्वखर्चाने पत्रके छापून केली जनजागृती




शिंदखेडा तालुक्यातील भडणें येथील पोलीस पाटील युवराज बागुल यांनी कोरणा आजाराबाबत उपायोजना, व,जनजागृती व्हावी या उद्देशाने स्वखर्चाने पत्रके छापून वाटप करण्यात आले यावेळी शिंदखेडा येथील तज्ञ  डॉ देवेंद्र पाटील एकनाथ लोहार
, विक्रम पाटील भाऊसाहेब ठाकूर उपस्थित पत्रक वाटून ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात  आले,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
घाबरू नका काळजी घ्या, अफवा पसरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका गावात खबरदारीचा उपाय म्हणून गावातील तरुण युवकांना सोबत घेऊन कोरोना आजाराबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले सध्या भारतात विषाणू संसर्ग चेसंकट उभे आहे मात्र या आजाराला घाबरून जाण्याचे कारण नाही या संकटापासून प्रतिबंध व्हावा व जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे आपल्या स्वतःसाठी कुटुंबासाठी पर्यायाने आपल्या गावासाठी आपण थोडी काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या संसर्ग पासून निश्चित सुरक्षित राहू शकतोकोरोना विषाणूजन्य संसर्ग प्रसार हा लोकांच्या एकत्रित समुहा मार्फत होत असल्याने कुठे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लग्न समारंभ यात्रा गर्दी होईल याठिकाणी जाऊ नये तसेच नागरिकांनी स्वच्छ हात रुमाल ठेवावा खोकताना शिंकताना हात रुमाल तोंडाला लावा बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने दुवा वैयक्तिक स्वच्छता ठेवून आपण संसर्ग टाळू शकतो तसेच अतिमहत्वाच्या कामाशिवाय बाहेर प्रवास टाळावा ताप, खोकला, श्वसनास त्रास होत असल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राची संपर्क साधा आपल्या गावाची आरोग्य कोरोना विषाणू संसर्गापासून सुरक्षित राहील ही प्रत्येकाची व स्वतःची जबाबदारी समजून प्रशासनास व आरोग्य विभागास सहकार्य करा घरातून बाहेर निघाल्यास स्वच्छ रुमाल,   चा वापर मांस व अंडी पूर्णपणे शिजवून व उघडून घ्या जंगली अथवा पाळीव प्राण्यांना निकट संपर्क टाळा असे विविध जनजागृतीपर पत्रकात नमूद करण्यात आले आहे याच्यातून गावात जनजागृती व उपाय योजनेबाबत माहिती मिळत असल्याबाबत ग्रामस्थांनी पोलीस पाटील युवराज बागुल यांचे कौतुक केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने