शिरपूर - आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. परिसंस्थेत युवती सभे अंतर्गत 'आरोग्य व स्वच्छता' विषयावर कार्यशाळा दि. 9 मार्च 2020 रोजी आयोजित करण्यात आली.
एस. एम. पटेल ऑडिटोरीम हॉल मध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शक म्हणून डॉ. जयश्री निकम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परीसंस्थेच्या संचालीका डॉ. वैशाली पाटील होत्या. परीसंस्थेतील सर्व युवती व महिला प्राध्यापिका यांनी हया कार्यशाळेचा लाभ घेतला.
डॉ. जयश्री निकम यांनी विदयार्थींनीना विविध विषयावर मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निरसन केले. आंतरीक सौदर्याचे महत्व हे बाहय सौंदर्या पेक्षा कसे जास्त आहे हे त्यांनी पटवून दिले. दैनंदिन जिवनात पोषक आहार, अन्न घटकांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले, निरोगी आहाराचे महत्व व त्याच प्रमाणे व्यायामाचे महत्व हे देखील त्यांनी पटवून दिले. प्रत्येक स्त्रीला तिच्या ध्येयांची पूर्ती करण्या करता उत्तम आरोग्य कसे महत्वाचे असते हे समजावून सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वैशाली पाटील यांनी जागतिक महिला दिवस हा फक्त एक दिवस न साजरा करता नेहमीच स्वत:च्या हक्का करता जागृत राहणे गरजेचे आहे. महिलांनी त्यांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणे गरजेचे आहे, हे सांगुन जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कु. करीश्मा सार्जे हीने सूत्रसंचालन केले. आभार कु. श्रदधा शिंपी हिने मानले.
कार्यक्रमाच्या यक्षस्वीतेसाठी युवती सभा समन्वयिका प्रा. छाया पाटील, प्रा. विजया अहिरे, प्रा. मानसी वैदय, प्रा. सपना सुर्यवंशी, प्रा. रोहिणी पाटील यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यक्षस्वी संयोजनाबद्दल माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष तपनभाई पटेल, संस्थेचे चेअरमन राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा. मनोज बेहेरे, एम.एम.एस. विभागप्रमुख डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख प्रा. तुषार पटेल, रजिस्ट्रार सौ. वैशाली गोरले यांनी कौतुक केले.
Tags
news